Why Not To Wish On 12 am On Birthday: मागील महिन्यात १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या आधी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रापती पुतीन यांची भेट घेतली होती. मोदी व पुतीन यांच्यातील संवादात पुतीन यांनी मोदींना मला तुमचा वाढदिवस असल्याची माहिती आहे मात्र आमच्या देशात वाढदिवसाच्या मूळ दिवसाच्या आधी शुभेच्छा देणे अशुभ मानले जात असल्याचे म्हंटले होते. याच मुद्द्याला धरून Quora या प्लॅटफॉर्मवर अनेकांनी या पर्थबद्दल अनेक मतं शेअर केली आहेत. यातूनच समोर आलेल्या माहितीनुसार केवळ रशियातच नव्हे तर हिंदू पौराणिक ग्रंथांमध्येही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबाबत काही संदर्भ देण्यात आले आहेत. हे नियम नेमके काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी हिंदू पुराणाचे दाखले देत सांगितले की, वाढदिवसाला सर्वात आधी शुभेच्छा देण्यासाठी रात्री १२ वाजता अनेकांकडे सेलिब्रेशन होते. खरंतर रात्री १२ वाजल्यापासून नव्या दिवसाला सुरुवात होत असली तरी रात्रीची वेळ ही कोणालाही शुभेच्छा देण्यासाठी तितकी शुभ मानली जात नाही. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्मक शक्तीदेखील अधिक प्रभावी असतात. त्यामुळे रात्री १२ वाजता दिलेल्या शुभेच्छा फलदायी नसतात अशी मान्यता आहे.

Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा

दरम्यान, हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. सकाळची वेळ ही ऋषी मुनींच्या साधनेची असते. ब्रम्हमुहूर्त म्हणजे पहाटे ४ च्या दरम्यान सर्वात शुभ काळ असल्याचे मानले जाते. याउलट रात्रीच्या वेळी वातावरणातील शक्ती पुनरुज्जीवित होण्यासाठी प्रक्रियेत त्यामुळे शक्यतो रात्री १२ वाजता कोणत्याही शुभेच्छ देणे टाळावे.

तुम्हाला वाढदिवस खास करायचा असल्यास एक छोटीशी टीप म्हणजे आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या मूळ जन्म मुहूर्तावर त्यांना शुभेच्छा देऊ शकता. यामुळे त्यांना आनंद होईल यात शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा माहितीपर असून यामागे अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)