scorecardresearch

१० मे पर्यंत ‘या’ राशींचा बँक बॅलन्स वेगाने वाढणार? मंगळ कृपेने लक्ष्मी देऊ शकते नशिबाला कलाटणी

Mars Transit 2023: तब्बल ६९ दिवस म्हणजेच १० मे पर्यंत मंगळदेव मिथुनमध्येच स्थिर असणार आहे. या मधल्या काळात मंगळदेव काही राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीची मोठी संधी देऊ शकतात.

Next 46 Days Mangal Transit In Gemini Zodiac Will Increase Bank Balance of Lucky Signs Lakshmi To Give More Money Astrology News
१० मे पर्यंत 'या' राशींचा बँक बॅलन्स वेगाने वाढणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mangal Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मंगळ हा साहस, शौर्य व वीरतेचा कारक मानला जातो. मंगळाच्या गोचरास ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. १३ मार्चला मंगळ ग्रह तब्बल पाच महिन्यांनी वृषभ राशीतून पुन्हा स्व राशीत म्हणजेच मिथुन मध्ये स्थिर झाला आहे. तब्बल ६९ दिवस म्हणजेच १० मे पर्यंत मंगळदेव मिथुनमध्येच स्थिर असणार आहे. या मधल्या काळात मंगळदेव काही राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीची मोठी संधी देऊ शकतात. या रेशो कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे जाणून घेऊया…

१० मे पर्यंत मंगळ ‘या’ राशींना देईल प्रचंड धनलाभ?

सिंह रास (Leo Zodiac)

मंगळ ग्रह आपल्या राशीच्या अकराव्या स्थानी स्थिर आहे. येत्या काळात आपल्याला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. आपले अडकून पडलेले काम व पैसे दोन्ही यश प्राप्ती करून देऊ शकतात. येत्या काळात अविवाहित मंडळींसाठी लग्नाचे योग तयार होत आहेत. तर विवाहित मंडळींना आपल्या प्रेमाच्या माणसाकडून अमाप प्रेम लाभू शकते. व्यवसायिक मंडळींना कामाच्या निमित्ताने परदेशवारीचे योग आहेत. धार्मिक कामांमध्ये सहभागी होता येईल. तुम्हाला व्यवसायातून अधिक यश लाभू शकते. कामाचा दबाव वाढेल पण मानसिक ताण जाणवणार नाही.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या गोचर कुंडलीत मंगळदेव नवव्या स्थानी भ्रमण करत आहेत. तूळ राशीच्या विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारा काळ लाभदायक ठरू शकतो. तसेच गरोदर महिलांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तुमच्या राशीत यंदा विवाह योग सुद्धा आहेत. शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास आपल्याला धनलाभाची प्रचंड मोठी संधी आहे पण तुम्हाला अत्यंत सतर्क राहून सर्व निर्णय घ्यावे लागतील.

हे ही वाचा<< १४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींच्या नशिबाला पूर्ण कलाटणी? २३ दिवस धनलाभाचे योग, भाग्यात दिसू शकते सूर्यासम तेज

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या गोचर कुंडलीत मंगळदेव कर्म स्थानी भ्रमण करणार आहे. नोकरदार मंडळींसाठी येणारे काही दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुमच्या कल्पना तुम्हाला सर्वांचे प्रेम व आदर मिळवून देऊ शकतात. तुमच्या वरिष्ठांचे मन वळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. यामुळे तुमच्या पद व पगारात वाढू होऊ शकते. मीडिया व बँकिंग क्षेत्रातील मंडळींना येणारे दोन महिने अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 12:48 IST

संबंधित बातम्या