Budh Graha Gochar Till 2nd April 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो ज्याचा शुभ- अशुभ प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२४ ला बुध ग्रहाचे यंदाच्या वर्षातील सर्वात महत्त्वाचे गोचर झाले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार बुध ग्रह २ एप्रिल २०२४ पर्यंत मार्गी स्थितीतच असणार आहे. जेव्हा एखादा ग्रह मार्गी अवस्थेत असतो तेव्हा तो १८० अंशात थेट परिक्रमा करत असतो. यामुळे त्याचा प्रभावही संबंधित राशींवर स्पष्ट व प्रत्यक्ष पाहायला मिळतो. बुध ग्रह हा ग्रहमालीकेत राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. बुद्धीसह धन- धान्य व मुख्यतः प्रगतीसाठी त्याची कृपा महत्त्वाची ठरते असाही समज आहे. यानुसार येत्या काळात तीन अशा राशी आहेत ज्या बुधाच्या गोचरामुळे अत्यंत लाभदायक स्थिती अनुभवणार आहेत. या मंडळींना रातोरात श्रीमंती अनुभवता येऊ शकते. या अचानक होणाऱ्या धनलाभासाठी नेमकं निमित्त काय असेल हे पाहूया..

२ एप्रिल पर्यंत ‘या’ तीन राशी कमावतील प्रचंड धन; ‘या’ रूपात लाभेल लक्ष्मीकृपा

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

बुध ग्रहाची सरळ चाल ही कन्या राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. एकतर बुध ग्रह आपल्या राशीचा स्वामी आहे गोचरानंतर बुधाचा प्रभाव आपल्या राशीच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी असणार आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला वाहन व प्रॉपर्टीचे लाभ होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे बदल घडून येतील तुम्हाला नवनवीन जबाबदाऱ्या उचलाव्या लागू शकतात ज्यामुळे तुम्हाला नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्रचंड मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, हॉटेल, मेडिकल अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना मोठा धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

बुध ग्रह मार्गी झाल्याने वृश्चिक राशीसाठी लाभदायक वेळ चालू आहे. बुध ग्रह आपल्या राशीच्या लग्न भावात स्थिर आहे. आपल्या राशीला सर्वात मोठा फायदा हा मानसिक व बौद्धिक स्वरूपात होणार आहे. आपल्याला एकाग्रता वाढल्याचे जाणवेल ज्यामुळे बुद्धीचा विकास करण्यासाठी मदत होईल. या बुद्धीच्या जोरावर आपण प्रचंड प्रगती करू शकणार आहात जी पुन्हा धनलाभाच्या स्वरूपात तुमच्याकडे येईल. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त करता येऊ शकते. तुम्हाला पैसे कमावताना जोडीदाराची खूप मदत होऊ शकते. अविवाहित मंडळींना लग्नाचे स्थळ येऊ शकते.

हे ही वाचा << २०२४ मध्ये शनीकृपा असणाऱ्या ‘या’ जन्मतारखांचा असेल बोलबाला; तुमचा मूलांक यात आहे का? पाहा भविष्यवेध

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनीची प्रिय रास कुंभ बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा मोठा लाभ अनुभवणार आहे. बुध ग्रह आपल्या राशीच्या इनकम भावात स्थिर होत आहे. २ एप्रिलपर्यंत ही स्थिर चाल होत असताना आपल्याला आर्थिक फायदा खूप होणार आहे. कक्षा रुंदावताना तुम्हाला अनपेक्षित असणारे आर्थिक स्रोत लाभू शकतात. आपल्याला गुंतवणुकीची मोठी संधी मिळू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करावा पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. तुम्ही कौशल्याचा विकास करू शकता ज्याचा फायदा तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी याची मदत होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)