November Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार सूर्य ग्रहाला मान-सन्मान, आत्मविश्वास, सरकारी नोकरी, वडील आणि प्रतिष्ठेचा कारक मानले जाते. तर शुक्र ग्रहाला वैभव, पैसा, ऐश्वर्य, वैवाहिक सुख आणि ऐशोआराम यांचा कारक मानले जाते. नोव्हेंबर महिन्यात हे दोन्ही ग्रह एकत्र येणार आहेत. ही युती वृश्चिक राशीत होईल. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळू शकते. चला जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत…
मकर राशी (Capricorn Horoscope)
सूर्य आणि शुक्र यांचा दुर्मिळ योग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नवीन कमाईचे मार्गही तयार होऊ शकतात. या काळात तुमचे नशीब मजबूत राहील आणि आर्थिक स्थिती चांगली होईल.
गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित काही फायदा होऊ शकतो. तसेच मित्र आणि वरिष्ठांचा आधार मिळेल. संततीकडून काही आनंदाची बातमीही मिळू शकते.
तूळ राशी (Libra Horoscope)
तुमच्यासाठी सूर्य आणि शुक्र यांचा दुर्मिळ योग लाभदायक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या कुंडलीत धन आणि बोलण्याच्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. कामधंदा किंवा व्यवसायात तुम्हाला मोठी यश मिळेल आणि उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. हा काळ आत्मविश्वास, यश आणि धैर्यात वाढ घेऊन येणार आहे.
एखादे मोठे काम किंवा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकते. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. व्यक्तिमत्व खुलून दिसेल आणि बोलण्यात प्रभाव वाढेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
सूर्य आणि शुक्र यांची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतील कर्मस्थळावर होणार आहे. त्यामुळे या काळात काम किंवा व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते.
आरोग्य चांगले राहील आणि मनात नवीन उत्साह जागृत होईल. जीवनात स्थिरता आणि सन्मान दोन्ही वाढतील. करियरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे. पैशांची आवक वाढेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो आणि व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
