Numerology Predictions for 2025 Number 6तुमच्यापैकी अनेक जण जीवनात पुढे काय होणार आहे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिस्थिती कशी असेल हे जाणून घेण्यासाठी कुंडली आणि ज्योतिषाची मदत घेतात. पण, तुमच्या मूलांकावरूनही याबाबत बरीचशी माहिती मिळते. याला अंकशास्त्र म्हणतात. अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वत:बद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. अंकशास्त्राद्वारे तुम्हाला मूलांकानुसार तुमच्या भविष्यात नेमकं काय घडेल, नोकरी, व्यवसाय, आर्थिक, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काय होईल हे जाणून घेता येईल. आपण आज ६ मूलांक असणाऱ्या व्यक्तीला नवीन २०२५ हे वर्ष नेमकं कसं जाईल हे पाहणार आहोत.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला झाला असेल, तर या तारखांचा मूल्यांक सहा येतो. सहा अंक शुक्र ग्रहाच्या अमलाखाली येतो. हा अंक ऐहिक सुखाचा निदर्शक आहे. या व्यक्ती कला शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असतात, विशेष म्हणजे या व्यक्ती खूप आदराने व लीनतेने वागतात.

मूलांक ६ ला कसे जाईल नवीन वर्ष?

यावर्षी २०२५ साल म्हणजे २+०+२+५ = ९ अंकाबरोबर सहा अंकाचा वर्षभर प्रवास असणार आहे, त्यामुळे मंगळातील शूरता, साहस यांच्या स्वभावात येईल पण त्यांचा त्यांनी दुरुपयोग करू नये. मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी फटकळपणे वागू नये. नाती जपावीत मात्र अन्याय, फसवणूक या विरोधात मंगळाची मदत घेऊन नक्कीच समोरच्याला आपली हिंमत दाखवावी.

फॅशन कलाकार, सौंदर्य प्रसाधने यांचा व्यवसाय शुक्र मंगळाच्या साहाय्याने उत्तम चालेल. भावनिक स्तरावर कोणतीही नाती निर्माण करू नये. प्रेमविवाहात निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सट्टा, रेस गैरमार्गाने पैसा कमावण्याच्या उद्योगधंद्यात भाग घेऊ नये. नको त्या अमिषाला बळी पडून दुप्पट पैसा अशा योजनांना बळी पडू नये.

Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरवा, पिवळा, पांढरा रंग नियमित वापरात ठेवावा. धार्मिक यात्रांनिमित्त प्रवास होतील. सहा महिन्यांनंतर खूपश्या समस्या निवारण होतील. विशेष करून मार्च, डिसेंबर महिना अधिकच उत्तम आणि लाभदायक ठरतील, कलाक्षेत्रातील लोकांना हे वर्ष कलेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल.