Mulank 6 Numerology : अंक शास्त्रानुसार, अंकाद्वारे व्यक्तीचा स्वभाव, दृष्टिकोन, मानसिकता आणि भाग्याला समजून घेता येते. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीची जन्मतिथी फक्त एक तिथी नसते तर त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि जीवनाविषयी जाणून घेता येते. १ ते ९ असे एकूण मूलांक असतात प्रत्येक मूलांकचा संबंध एखाद्या विशिष्ट ग्रह किंवा ऊर्जेशी असतो. आज आपण एका अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जे कधीही मित्रांचा विश्वासघात करत नाही आणि प्रियजनांना सुद्धा एकटे सोडत नाही.
मूलांक ६
जर व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक ६ असतो. मूलांक ६ चा ग्रह स्वामी शुक्र आहे जो प्रेम, सौंदर्य, कला आणि क्रिएटिव्हीचा प्रतीक मानला जाते. या मूलांकचे लोक नात्यात खूप प्रामाणिक असतात.
मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
मूलांक ६ असणारे लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. त्यांचा स्वभाव अत्यंत कोमळ, संवेदनशील आणि सौम्य असतो. या लोकांची अस्तित्व लोकांना सहज प्रभावित करते. या लोकांना सजावट, सुंदरता, फॅशन आणि कलेविषयी विशेष प्रेम असते.
या मूलांकचे लोक खासकरून जीवनात संतुलन निर्माण करतात. ते अत्यंत संवेदनशील असून भावनात्मक बाजूने मजबूत राहतात. या लोकांना नेहमी हसायला आवडते आणि दुसऱ्यांना आनंद द्यायला यांना खूप आवडते. यांची संगत लोकांना खूप आवडते. लोक यांच्या बरोबर जास्तीत जास्त घालवतात.
मूलांक ६ असलेले लोक ज्या लोकांशी मैत्री करतात, त्यांना कधीही धोका देत नाही. हे लोक नात्याबाबत खूप जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील असतात. ते कोणतेही नाते खूप मनापासून निभवतात. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने या लोकांमध्ये कला व क्रिएटिव्हीटी भरपूर असते. हे लोक संगीत, चित्रकला, डान्स, फॅशन डिझाइन आणि इंटीरियर सारख्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये चांगले काम करू शकतात.
या लोकांचा स्वभाव अत्यंत मृदू असतो. हे लोक ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घेतात. ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. ते आयुष्यात मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)