Numerology New Year 2025 : अंकशास्त्रामध्ये अंकाना विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रा नुसार, प्रत्येक अंकामागे विशिष्ट ऊर्जा असते जी व्यक्तीच्या व्यक्तिमत्व, व्यवहार, स्वभाव आणि भविष्याविषयी सांगते. जर एखाद्या व्यक्तिचा जन्म २३ एप्रिल रोजी झाला असेल तर त्या व्यक्तिचा मूलांक (२+३=५) असतो. सध्या नवीन वर्षाची सर्वांना चाहुल लागली आहे. अशात नवीन वर्ष आपले कसे जाईल, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहेत. आज आपण मूलांक १ असणार्‍या लोकांचे नवीन वर्ष कसे जाईल, याविषयी जाणून घेणार आहोत.

मूलांक १

ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक १ असतो. एक अकांचा स्वामी ग्रह हा सूर्य असतो म्हणजेच या लोकांवर सूर्याचा विशेष प्रभाव असतो. हे लोक स्वाभिमानी स्वभावाचे असतात.

हेही वाचा : Shukra Gochar 2024 : २८ डिसेंबर पासून या राशींना मिळणार पैसाच पैसा, पालटणार ‘या’ पाच राशींच्या लोकांचे नशीब; होणार दुप्पट नफा

स्वभाव आणि व्यक्तिमत्व

अंकशास्त्रानुसार २०२५ मध्ये लोक या लोकांना अंहकारी समजू शकतात. त्यामुळे या लोकांना स्वाभिमान आणि अभिमानातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ऊर्जा आणि अनुभवाच्या जोरावर हे लोक प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतात. हे लोक स्वभावाने रागीट असू शकतात, ज्यावर त्यांनी नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. हे लोक प्रेम आणि आपुलकी व्यक्त करताना संकुचित वागू शकतात पण या लोकांसाठी भावना खूप महत्त्वाच्या असतात. नियमांचे पालन केल्यामुळे या लोकांना यश प्राप्त होऊ शकते.

हेही वाचा : सूर्य गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, वर्षाच्या शेवटी मिळणार अचानक पैसा अन् धन

२०२५ हे वर्ष कसे जाईल?

या वर्षी या लोकांवर १, ९, २ आणि ५ अंकाचा विशेष प्रभाव राहीन. अंक ९ सामान्य राहीन आणि कोणताही अंक विरोधात नसणार. त्यामुळे येते वर्ष या लोकांसाठी चांगले राहीन. नवीन वर्षात हे लोक नवीन कामाची सुरुवात करू शकतात ज्यामध्ये ते कार्यक्षमता आणि अनुभवाच्या जोरावर यश मिळवतील. समाजात मान प्रतिष्ठा वाढेन. जर हे लोक राजकारणात असेल तर यांना पद प्राप्तीचे योग जुळून येईल. कुटुंब नातेवाईकांमध्ये गोडवा दिसून येईल. आर्थिक दृष्ट्‍या हे वर्ष चांगले राहीन. प्रेम आणि वैवाहिक जीवन उत्तम राहीन. या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभ अंक – १०
शुभ रंग – लाल