Surya Gochar 2024 : वैदिक पंचागनुसार, १५ डिसेंबर २०२४ रोजी सूर्य ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या वर्षीचे हे शेवटचे सूर्य गोचर असेल. तसेच याबरोबर खरमास सुरू होईल. हिंदू धर्मात खरमासला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पासून लग्न, साखर पुडा सारख्या शुभ कार्यावर बंदी घातली जाते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाला ग्रहांचे राजा आहे आणि सूर्याला आत्मा, सन्मान आणि यशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये जातात तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर पडतो. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना सूर्य गोचर पासून चांगला लाभ मिळणार आहे. जाणून घेऊ या सूर्याने धनु राशीमध्ये प्रवेश केल्यावर कोणत्या राशींचे नशीब उजळू शकते.

हेही वाचा : Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार

मेष राशी (Mesh Rashi)

या गोचर मुळे मेष राशीच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल. जर हे लोक कुठे फिरायचा विचार करत असतील तर वर्षाच्या शेवटी हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. या दरम्यान घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यामध्ये या लोकांची आवड वाढेन. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहे किंवा नोकरी करत आहे, त्यांना सुद्धा या दरम्यान लाभ प्राप्त होऊ शकतात.

सिंह राशी (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे. धन कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. जोडीदाराबरोबर नाते सुधारतील. कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रेचे योग जुळून येतील. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. भाऊ बहि‍णींबरोबर नात्यात गोडवा दिसून येईल. सूर्याच्या गोचरच्या प्रभावामुळे या लोकांना अपार धन संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते.

हेही वाचा : २०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ

मीन राशी (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांना या गोचरपासून आर्थिक लाभ मिळेन. घर जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. लव्ह लाइफ मध्ये प्रेम वाढेन आणि भविष्याचे प्लानिंग करेन. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. या दरम्यान हे लोक पैशांची बचत करू शकतील. या लोकांच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेन. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेन. कुटुंबाचे सहकार्य मिळेन. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)