Personality Trait According To Birth Date : अंकशास्त्रात एक प्राचीन आणि रहस्यमय शास्त्र आहे; जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे, स्वभावाचे, नशिबाचे रहस्य उलगडण्यासाठी मदत करते. या शास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज करून जी संख्या येते; त्याला मूलांक म्हणतात. त्याचप्रमाणे १ ते ९ अंक प्रत्येक ग्रहाशी संबंधित असतो; जी व्यक्तीच्या विचारांवर, व्यक्तिमत्त्वावर, वर्तनावर आणि जीवनाच्या दिशेने प्रभाव पाडते. तर आज आपण ५, १४ किंवा २३ जन्म तारीख असलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा मूलांक ५ आहे; जो बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, चातुर्य आणि तीक्ष्ण निर्णय क्षमतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच, या तारखेला जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व अनोखे असते.

बोलण्यात हुशार

या मुलींची वागणूक खूपच आकर्षक असते. बोलण्याच्या शैलीमुळे त्या कोणालाही प्रभावित करू शकतात. त्या कधीही शब्द चुकीच्या पद्धतीने वापरत नाहीत आणि संयमाने बोलणे पसंत करतात. त्या कोणतेही निर्णय घेताना घाई करत नाहीत. पहिल्या त्या गोष्टीचा विचार करतात आणि मगच एक पाऊल पुढे टाकतात; त्यामुळे आयुष्यात नेहमीच त्यांना यश मिळते.

या मुली बुद्धिमत्ता आणि नियोजनाने त्यांचे करिअर निवडतात. त्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यास मदत करतो. व्यवसाय, माध्यमे, लेखन, जनसंपर्क आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात त्या उत्कृष्ट कामगिरी करतात. या मुलींचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांची हुशारी आणि सतर्कता. त्यांना कोणापासून अंतर ठेवावे, कोणाशी कसे वागावे याबद्दल लगेचच कळते आणि म्हणून त्या प्रत्येकावर विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याला प्राधान्य देतात.

स्वतंत्र विचारसरणीच्या मुली

पाच मूलांक असणाऱ्या मुली त्यांच्या स्वातंत्र्याला, स्वाभिमानाला खूप महत्त्व देतात. त्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याऌ प्राधान्य देतात आणि इतरांचा त्यांच्यावर सहज प्रभाव पडत सुद्धा नाही.