Lucky Zodiac Sign October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो, तर काही राशीच्या व्यक्तींना अडचणींना समोरे जावे लागते. ऑक्टोबर महिना सुरू होऊन एक आठवडा झाला असून आतापर्यंत काही ग्रहांचे गोचर झाले आहे, तसेच पुढील काही दिवसात आणखी काही ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
‘या’ पाच राशींवर पडणार ग्रहांचा शुभ प्रभाव
मेष
ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.
सिंह
ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
तूळ
तूळ राशीसाठीही ग्रहांचे गोचर दिवस खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही ऑक्टोबर मधील ग्रहांचे गोचर अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठीही ऑक्टोबर महिना आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)