October Horoscope Shani: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह आपली स्थिती ठरलेल्या वेळेनंतर बदलतात आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर, अर्थव्यवस्थेवर, करिअरवर आणि मेष ते मीन या सर्व १२ राशींवर होतो. न्याय आणि कर्माचे कारक शनी ग्रह सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. भगवान शनीच्या कृपेने लोकांचे नशीब आणि जीवन बदलू शकते.
शनी हा ग्रह ३० वर्षांत राशीचं संपूर्ण चक्र पूर्ण करतो आणि एखाद्या नक्षत्रात येण्यासाठी त्याला सुमारे २७ वर्षे लागतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये शनी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि याचा वेगवेगळ्या राशींवर वेगळा परिणाम होईल.
सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. त्याचबरोबर, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रवारी रात्री ९:४९ वाजता शनी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत सर्व १२ राशींच्या लोकांवर शुभ किंवा अशुभ परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राला बृहस्पतीचे नक्षत्र मानले जाते, त्यामुळे काही राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक लाभ मिळतील. चला तर मग पाहूया, शनीने पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल…
कर्क राशी (Cancer Horoscope)
शनीने पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात गोचर केल्याने कर्क राशीच्या लोकांना या काळात खूप फायदा होईल. शनिच्या कृपेने त्यांना विविध क्षेत्रात मोठी यश मिळेल आणि ते त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. शनी या राशीच्या नवम भावात असतील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले नशीब येईल. ते गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवू शकतात. शनी गोचरामुळे कर्क राशीच्या लोकांना कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता करू शकतात. शनिच्या कृपेने जीवनात आनंद येईल आणि अनेक समस्या दूर होतील.
तूळ राशी (Libra Horoscope)
शनी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात गोचर केल्याने तूळ राशीच्या लोकांना पैशांच्या अनेक संधी मिळतील आणि नशीब प्रत्येक पावलावर साथ देईल. जर तुमचे काही पैसे कुठे अडकलेले असतील, तर शनिच्या कृपेने हा काळात ते मिळतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या काळात तुम्हाला मोठ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्ही दीर्घकाळ चांगल्या आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. तूळ राशीचे लोक परदेशातून चांगला व्यापार करू शकतात आणि विविध व्यवहारातून चांगला पैसा मिळवू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात शांती आणि समंजसपणा राहील, आणि तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
शनी नक्षत्रातील बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतील. या काळात कुंभ राशीचे लोक योग्य आत्मपरीक्षण करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतात. तुमचे बोलणे गोड आणि नम्र होईल, ज्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. कामाच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्ही जुन्या मित्रांशी किंवा प्रियजनांशी खुल्या मनाने संवाद साधून समस्या सोडवू शकता. कुंभ राशीचे लोक विविध क्रियाकलापात सहभागी होण्यासाठी उत्साहित राहतील आणि जीवनात योग्य उत्साह कायम ठेवू शकतात.
मीन राशी (Pisces Horoscope)
शनीने पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात गोचर केल्याने मीन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. कर्मफळ देणारा शनी तुमच्या राशीच्या लग्न भावात आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनेक लाभ मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून मेहनतीसाठी प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे समाजात मान मिळेल. शासन, राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित क्षेत्रांतही विशेष फायदा होऊ शकतो. मीन राशीचे व्यापारी विविध व्यवहार आणि गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळवू शकतात. या काळात त्यांची सर्व योजना यशस्वी होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)