Vinayaka Chaturthi 2025 Date : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा गणेश चतुर्थी असते, यातील पहिल्या पंधरवड्यातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी उपवास करण्याचे व्रत केल्याने आणि भगवान गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्याने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात. तर ऑक्टोबर महिन्यातील विनायक चतुर्थीची तारीख, मंत्र आणि शुभ काळ यांच्याबद्दल जाणून घेऊयात…
विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त
कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केले जातात. वैदिक दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे १ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत संपणार आहे.
- ब्रह्म मुहूर्त – सकाळी ४:४६ ते ५:३७
- विजय मुहूर्त – दुपारी १:५७ ते २:४२
- गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ५:४२ ते ६:०७
- निशिता मुहूर्त – रात्री ११:४० ते १२:३१
विनायक चतुर्थी पूजा विधी
- सकाळी लवकर उठून अंघोळ करा.
- शुभ वेळ पाहून पूजा सुरू करा आणि बाप्पाची मूर्ती पाटावर ठेवा.
- प्रथम, गणपतीला गंगाजलाने अभिषेक करा.
- बाप्पाला तुमच्या आवडीच्या रंगाचे वस्त्र अर्पण करा.
- कुंकू आणि चंदनाचा टिक्का लावा.
- जास्वदांची फुले अर्पण करा.
- बाप्पाला दुर्वा, प्रसाद म्हणून मोदक आणि लाडू अर्पण करा.
- पूजा आणि काही श्लोक म्हणा.
गणपतीबाप्पासाठी श्लोक
ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥
ऊँ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥
