Palmistry: हस्तरेखा शास्त्रानुसार व्यक्तीच्या हातावर असलेल्या रेषा आणि चिन्हे व्यक्तीचा स्वभाव, भाग्य, करिअर आणि आयुष्याच्या घडामोडींविषयी महत्त्वाची माहिती देतात. जशी ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवरून भविष्यवाणी केली जाते, तशीच हस्तरेखाशास्त्रात हातातील रेषांवरून व्यक्तीच्या यश-अपयशाचं विश्लेषण केलं जातं. हातात असलेल्या जीवनरेषा, हृदयरेषा, विवाहरेषा, सूर्यरेषा आणि संततीरेषेसोबतच एक अत्यंत महत्त्वाची रेषा म्हणजेच भाग्यरेषा (Luck Line) किंवा शनि रेषा (Saturn Line).

ही रेषा मनिबंधापासून (मनगटापासून) सुरू होऊन तर्जनी किंवा मधल्या बोटापर्यंत जाते. ज्यांच्या हातात ही रेषा स्पष्ट, गडद आणि लांब असते त्यांचं आयुष्य अनेक प्रकारे धन, यश आणि सन्मानानं उजळलेलं असतं.

अशा लोकांना लाभते भाग्याची विशेष साथ

ज्यांच्या हातात भाग्यरेषा गडद, स्पष्ट आणि सरळ असते, ते लोक भाग्यवान मानले जातात. या व्यक्तींना आयुष्यात कमी कष्टात मोठं यश मिळतं. त्यांच्या आयुष्यात पैशाची कधीही कमतरता नसते. हे लोक तरुण वयातच श्रीमंत होतात आणि व्यवसायात रिस्क घेऊन मोठं संपत्ती निर्माण करतात. त्यांचं सामाजिक स्थान उच्च असतं आणि लोकांमध्ये त्यांना मान-सन्मान मिळतो.

मेहनती, कर्मशील आणि शनिदेवांच्या कृपापात्र

जीवनरेषेतून सुरू होणारी भाग्यरेषा अत्यंत शुभ मानली जाते. अशा व्यक्ती मेहनती, जबाबदार आणि आत्मविश्वासी असतात. ते आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या प्रयत्नांनी मोठं यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात पैशाचं आगमन सातत्याने होतं आणि त्यांच्यावर शनिदेवांची विशेष कृपा राहते. म्हणूनच त्यांना समाजात प्रतिष्ठा, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.

३५ वर्षांनंतर उजळते नशिब

हस्तरेखाशास्त्रानुसार ज्यांच्या हातात भाग्यरेषा मस्तिष्करेषेतून सुरू होते, त्यांचे भाग्य साधारणपणे ३५ वर्षांनंतर तेजस्वी होतं. या वयानंतर त्यांना करिअरमध्ये स्थैर्य, उच्च पद आणि सरकारी नोकरीची संधी मिळते. त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळून ते वेगाने प्रगती करतात.

पण ज्यांची भाग्यरेषा मस्तिष्करेषेवर येऊन थांबते, त्यांना आयुष्यात काही काळ निर्णयांच्या चुकांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरीही हे लोक दानशूर, इतरांच्या मदतीस तत्पर आणि उदार मनाचे असतात.

हस्तरेखा शास्त्र सांगते की, भाग्यरेषा फक्त नशिबाचं प्रतीक नसून ती कर्म, विचार आणि निर्णयक्षमतेचं प्रतिबिंब आहे. ज्यांच्या हातात ही रेषा लांब आणि स्पष्ट असते, ते लोक आपल्या मेहनतीनेच भाग्य घडवतात आणि जीवनात आर्थिक तसेच सामाजिक प्रगती साधतात. शनिदेवांच्या कृपेनं त्यांच्या वाट्याला स्थैर्य, मान आणि यश मिळते.