सर्व १२ राशींवर ग्रहांचा नियमित प्रभाव राहतो. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना ग्रह परिवर्तनाचा त्रास होतो, तर काहींना फायदा होतो. काही राशींना ग्रहाच्या परिवर्तनामुळे आधी त्रास झाला असेल तर त्यांना ग्रहाच्या परिवर्तनामुळे फायदा होतो. तर भूतकाळात ज्यांचा फायदा झाला असेल तर त्यांच्यासाठी ग्रहाच्या परिवर्तनाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक महिना वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे प्रभाव घेऊन येतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या ५ राशींना होणार फायदा.

आज तुम्हाला हिंदू नववर्षाच्या पहिल्या महिन्यात ग्रहांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या राशींसाठी हा काळ कसा असेल याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्योतिषी एके शुक्ल नुसार, हिंदू पंचांगनुसरा, २०२२ या इंग्रजी वर्षात, चैत्र महिना १८ मार्चपासून म्हणजेच होळीच्या दिवसापासून सुरू झाला आहे. तर आता झालेले ग्रहांचे परिवर्तन हे काही राशींसाठी फायद्याचे ठरेल तर काहींसाठी नाही. चला तर मग जाणून घेऊया हिंदू नववर्षाचा पहिला महिना चैत्र हा सर्व १२ राशींसाठी कसा असेल

आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती

कर्क (Cancer)

बदलीची शक्यता, भावांच्या सहकार्याने काही रखडलेले पैसे मिळतील, नोकरीत वरिष्ठांची साथ राहील. कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून धनप्राप्ती होऊ शकते, कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता.

कन्या (Virgo)

भावांच्या मदतीने व्यवसाय विस्ताराची योजना साकार होईल. व्यवसायात आयात-निर्यात लाभाची संधी मिळेल. कुटुंबातील शुभ कार्याच्या दरम्यान कपडे इत्यादी भेटवस्तू देखील मिळू शकतात. आईच्या सहकार्याने वाहन सुखात वाढ होऊ शकते.

आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी मातेचे वरदान, घरात आणतात भरभराट

वृश्चिक (Scorpio)

आत्मविश्वासाने परिपूर्ण असूनही, स्वत:वर संयम ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आळशीपणाच्या अतिरेकामुळे जीवनसाथीसोबत दुरावण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील बदलादरम्यान कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल. आईची साथ मिळेल. त्यामुळे नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

नोकरीत बदल होण्याची शक्यता असताना मालमत्तेतून उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रगतीची शक्यता आणि उत्पन्न वाढेल. तुम्हाला एखाद्या धार्मिक सत्संगी कार्यक्रमाला जावे लागू शकते.

आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त

कुंभ (Aquarius)

आईशी वैचारिक मतभेद असताना रागाचा अतिरेक टाळा. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असताना नोकरीत दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील, परंतु तुम्हाला संयम ठेवावा लागेल. कुटुंबाचा पाठिंबा असूनही कपड्यांवरील खर्च वाढू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)