Astrology: मान्यतेनुसार, अनेक लोक सहसा त्यांच्या गळ्यात किंवा हातात लाल रंगाचा धागा बांधतात. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात लाल धागा बांधण्याची परंपरा आहे. लाल धागा शुभ मानला जातो. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार लाल धागा धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. यासोबतच ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधू नये.
लाल धागा घालण्याचे फायदे
मान्यतेनुसार, हातात लाल धागा बांधल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर रामभक्त भगवान हनुमानाचाही आशीर्वाद मिळतो असे सांगण्यात आले आहे. मनगटावर लाल रंग बांधल्याने कुंडलीत मंगळ मजबूत स्थितीत असतो. यातून पैसे वगैरेही मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे लाल धागा घालणे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते. यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो, ज्याचा जीवनावर चांगला परिणाम होतो.
( हे ही वाचा: १७ जानेवारी २०२३ पर्यंत ‘या’ ५ राशींना होऊ शकतो प्रचंड धनलाभ; शनिदेवाच्या कृपेने व्यवसायातही होईल फायदा)
लाल धागा कोणी घालू नये?
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव कुंभ आणि मीन राशीचा स्वामी आहे. असे म्हणतात की शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. त्यामुळे कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी चुकूनही लाल धागा घालू नये.
लाल धागा कोणी परिधान करावा?
मेष, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा. मान्यतेनुसार या राशीच्या लोकांना लाल धागा बांधून हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो असे सांगण्यात आले आहे.
( हे ही वाचा: जानेवारी २०२३ पर्यंत ‘या’ राशींना सहन करावा लागेल शनिदेवाचा त्रास; मोठे संकट येण्याचे संकेत)
हातात धागा बांधण्याची शास्त्रीय कारणे
श्रद्धेनुसार हातात धागा बांधण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. हातात धागा बांधल्याने आर्ट अटॅक, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
