Numerology Trustworthy Girls Birth Date : अंकशास्त्र जीवन समजून घेण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे एक प्राचीन शास्त्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेतील लपलेल्या संख्यांवर आधारित हे शास्त्र व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, विचार, सवयी आणि भविष्य याबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. त्यामुळे अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तुमच्या जन्मतारखेची गणना करून, तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ- जर तुमची जन्मतारीख १० असेल, तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे.

तर आज आपण अंकशास्त्रानुसार अशा मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येतो…

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. त्यांचा स्वामी ग्रह चंद्र आहे; जो मन, भावना व मानसिक स्थितीचे प्रतीक आहे. चंद्र आंतरिक शांती प्रदान करतो म्हणून या संख्येचे लोक भावनिक, सर्जनशील व शांत असतात. मूलांक २ असलेल्या स्त्रिया आपले नाते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जपतात. त्या कोणत्याही परिस्थितीत फसवणूक टाळतात आणि इतरांचा विश्वास टिकवून टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानतात. त्यांचे सौम्य हृदय त्यांना आणखीन खास बनवते.

अंकशास्त्रानुसार या महिला उदार स्वभावाच्या असतात. त्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवतात. त्यांचा शांत, संतुलित व सहानुभूतिशील स्वभाव त्यांना कोणत्याही परिस्थितीला सहजतेने हाताळण्यास अनुमती देतो. मूलांक २ च्या महिला स्वभावाने सर्जनशील आणि भावनिक असतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी घट्ट नाते निर्माण करायला आवडते आणि प्रत्येक नात्यात त्या भावनांना जास्त महत्त्व देतात. त्यांचे दयाळू हृदय व सौम्य स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते.