हस्तरेखाशास्त्र हे तळहातावरील रेषा आणि चिन्हं माणसाच्या स्वभाव आणि भविष्याविषयी बरंच काही सांगते असे मानले जाते. हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावरील चिन्हं आपल्याला भविष्याविषयी चांगले वाईट संकेत देतात. असं म्हणतात, तुमच्या हातावर ‘V’आकाराचे चिन्ह असेल तर तुमच्या नशीबाला कलाटणी मिळू शकते. याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत.

V आकाराचे चिन्ह

हस्तरेखाशास्त्रानुसार ‘V’आकाराचे चिन्ह हे यशाचे प्रतिक आहे. ज्या व्यक्तिच्या तळहातावर V आकाराचे चिन्ह असेल त्यांना आयुष्यात कायम यश मिळते, असे मानले जाते. असे म्हणतात की हे व्यक्ती आयुष्यात भरपूर पैसा कमावतात आणि नेहमी आनंदी राहतात.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to Make Cabbage Vada Recipe summer food
चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी

हेही वाचा : ame Astrology : ‘A’अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? नावाचे पहिले अक्षर सांगते व्यक्तिमत्त्व

V आकाराचे चिन्ह तळहातावर कुठे असावे?

V आकाराचे चिन्ह तळहातावर एका विशिष्ट ठिकाणी असल्याचे शुभ मानले जाते. हस्तरेखाशास्त्रानुसार, जर तळहातावर V आकाराचे चिन्ह तर्जनी आणि मध्यमा बोटाच्यामध्ये असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान समजली जाते. असे लोक नेहमी सकारात्मक राहतात आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यास तयार राहतात, असे मानले जाते.

हेही वाचा : या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती असतात भाग्यवान? समाजात मिळतो विशेष आदर-सन्मान!

स्वभाव

  • असं म्हणतात की हे लोक खूप हास्यविनोदी स्वभावाचे असतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, वयाच्या सुरवातीला हे लोक खूप संघर्ष करतात आणि नंतर वयाच्या ३५ वर्षानंतर खूप पैसा कमवतात. या काळात हे लोक नोकरी करताना त्यांना चांगले पद प्रतिष्ठा मिळते आणि व्यवसायात ते खूप प्रगती करतात असे मानले जाते.
  • हस्तरेखाशास्त्रानुसार, ज्या व्यक्तिच्या तळहातावर V आकाराचे चिन्ह असेल तो व्यक्ती लोकांचा विश्वास सहज जिंकतो आणि हे लोक त्यांच्या प्रामाणिकपणामुळे खूप समोर जातात.
  • असं म्हणतात की या व्यक्तीला चांगले कुटूंब लाभते आणि कुटूंबात खूप आदर सन्मान मिळतो. हे लोक स्वभावाने खूप प्रेमळ आणि दयाळू असतात आणि मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात, असे मानले जाते.
  • असं म्हणतात की हे लोक नेहमी मित्र, नातेवाईक यांच्या मदतीला धावतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, हे लोक जबाबदारीपासून कधीच दूर पळत नाही उलट त्यांना जबाबदारी स्वीकारायला आवडते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)