Pisces Horoscope 2024 : २०२४ या नवीन वर्षाची सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्षासंदर्भात सर्वांची उत्सुकता शिगेला लागली आहे. राशीचक्रातील प्रत्येक राशीचे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळे असेल. आज आपण राशीचक्रातील शेवटची रास म्हणजेच मीन राशीचे नवीन वर्ष कसे जाणार, याविषयी जाणून घेणार आहोत.
संपूर्ण वर्षभर या राशीत दुसऱ्या स्थानावर गुरू असेल ज्यामुळे त्यांना आर्थिक आणि कौटूंबिक सुरक्षा लाभेल. १ मे नंतर या राशीच्या लोकांना व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल. त्यांचा विकास होईल. आर्थिक स्थितीबरोबर त्यांचे वैवाहिक आयुष्यात सुद्धा सकारात्मकता जाणवेल आणि त्यांची जबाबदारी वाढेल. एकंदरीत आर्थिकदृष्ट्या या राशीचे नवीन वर्ष उत्तम असेल.
या राशीत शनि वर्षभर १२ व्या स्थानावर असणार आहेत त्यामुळे आर्थिक व्यव्हार करताना काळजी घ्यावी लागेल. पैसा जपून खर्च करावा लागेल. पहिल्या स्थानावर राहू आणि सातव्या स्थानावर केतू असल्यामुळे वैवाहिक जीवनात चढ उतार पाहायला मिळतील. त्यामुळे थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.
हेही वाचा : २०२४ मध्ये कुंभ राशीला होणार अचानक धनलाभ, जाणून घ्या करिअरपासून नातेसंबंधांपर्यंत; कसं असणार नवीन वर्ष?
नव्या वर्षात मित्रांबरोबरचे नाते दृढ होतील. या नवीन वर्षात कोणताही लहान मोठा निर्णय घेताना विशेष काळजी घ्या. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वर्षाच्या सुरुवातीला प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा दिसून येईल. नवीन वर्षी पाचव्या स्थानी मंगळचा प्रभाव असल्यामुळे अडचणी येऊ शकतात.
नवीन वर्षाच्या नाते संबंध जपताना काळजी घ्यावी. नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. स्वत:चे आणि तुमच्या प्रिय लोकांचे आरोग्य चिंतेचा विषय ठरू शकतात. करिअरच्या दृष्टीकोनातून हे वर्ष सकारात्मक दिसून येत आहे. नोकरीच्या ठिकाणी भरपूर यश मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल.
विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीचे दिवस चांगले असेल. कितीही अडचणी आल्या तरी मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटूंबात अडचणी येतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. निरोगी आहार आणि जीवनशैली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.