Pitru Paksha 2024 All Date, Rituals and Significance :  पितृ पक्षातील १५ दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १५ दिवस चालते. तर जाणून घेऊ या यावेळी पितृ पक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील?

पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते. त्यांना मोक्ष प्राप्त होतो. पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.

Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?
How To Clean Water Tanki Before Monsoon
१० रुपयांत टाकीतला गाळ करा गायब, पाणी नेहमी राहील स्वच्छ; टाकीत उतरण्याची पण गरज नाही, सहज जुगाडाचा Video पाहा
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…

पितृ पक्षाचे महत्त्व

पितृ पक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूर्वज मृत्युभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृ पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून, त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो.

दुसरीकडे पितृ पक्षातील तिथीनुसार, पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते.

पितृ पक्ष २०२४ ची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे?

पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत असतो. या वर्षी पितृ पक्ष १७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल. सर्व पितृ अमावस्येला पितृ मोक्ष अमावस्या आणि महालय, असेही म्हणतात.

पितृ पक्ष २०२४ श्राद्ध तारखा (Pitru Paksha 2024 All Dates)

पौर्णिमा श्राद्ध – १७ सप्टेंबर २०२४ (मंगळवार)
प्रतिपदा – १८ सप्टेंबर २०२४ (बुधवार)
द्वितीया श्राद्ध – १९ सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
तृतीया श्राद्ध – २० सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
चतुर्थी श्राद्ध – २१ सप्टेंबर २०२४ (शनिवार)
महाभरणी – २१ सप्टेंबर २०२४ (शनिवार)
पंचमी श्राद्ध – २२ सप्टेंबर २०२४ (रविवार)
पष्ठी श्राद्ध – २३ सप्टेंबर २०२४ (सोमवार)
सप्तमी श्राद्ध – २३ सप्टेंबर २०२४ (सोमवार)
अष्टमी श्राद्ध – २४ सप्टेंबर २०२४ (मंगळवार)
नवमी श्राद्ध – २५ सप्टेंबर २०२४ (बुधवार)
दशमी श्राद्ध – २६ सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
एकादशी श्राद्ध – २७ सप्टेंबर २०२४ (शुक्रवार)
द्वादशी श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४ (रविवार)
माघ श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४ (रविवार)
त्रयोदशी श्राद्ध – ३० सप्टेंबर २०२४ (सोमवार)
चतुर्दशी श्राद्ध – १ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार)
सर्व पितृ अमावास्या – २ ऑक्टोबर २०२४ (बुधवार)