Pitru Paksha 2025: हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या १५ दिवसांच्या काळात पितृ पंधरवडा म्हणजेच पितृ पक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून, त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. यंदा पितृ पक्ष ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झाला असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणार आहे.
पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते, असा समज आहे. पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. मात्र, याव्यतिरिक्त पितृ पक्षामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या वर्ज्य मानल्या जातात.
पितृ पक्षात ‘या’ गोष्टी वर्ज्य का मानल्या जातात?
शुभ कार्य आणि नव्या कामाची सुरुवात
पितृ पक्षाच्या काळात कोणतेही शुभ कार्य म्हणजेच लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, भूमिपूजन यांसारखे कोणतेही शुभ कार्य, तसेच नवा उद्योग, व्यवसाय सुरू करणे यांसारख्या नव्या कामाची सुरूवात वर्ज्य मानले जाते. कारण- शास्त्रानुसार प्रत्येक महिना ज्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या तरी देवी-देवतांच्या पूजा-आराधनेसाठी समर्पित आहे. त्याचप्रमाणे पितरांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळवून देण्यासाठी पितृ पक्षाचे १५ दिवस असतात. त्यामुळे हा काळ शुभ कार्य आणि नवीन कामाची सुरुवात वर्ज्य करून, केवळ पितरांचे स्मरण करण्यासाठी उचित मानला जातो.
नवीन घर, कपडे, वाहन, दागिने खरेदी करू नयेत
पितृ पक्षाच्या काळात कधीही नवीन घर, कपडे, वाहन, दागिने खरेदी करू नयेत. हा काळ पितरांचे स्मरण करून, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असतो. परंतु, या काळात या वस्तू खरेदी केल्यास पितर तुमच्यावर नाराज होऊ शकतात, असा समज आहे.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)