Rahu Transit 2025 Kumbh Rashi Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह म्हणून ओळखला जातो, तर शनीच्या पाठोपाठ राहू हा अत्यंत धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, राहू १८ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू १८ वर्षांनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे. राहू ग्रहाने शनीच्या राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळण्याची शक्यता आहे. राहू हा एक छाया ग्रह म्हणून ओळखला जातो. राहूची दृष्टी आयुष्यात दुःख व कष्ट वाढवू शकते असा समज आहे, पण कुंभ राशीतील राहूच्या स्थानानुसार काही राशींची चांदी होण्याची चिन्हे आहेत. सर्वाधिक फायद्यात असू शकतील अशा या राशी कोणत्या हे पाहूया…

‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब?

मेष

राहूच्या राशी बदलामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येताना दिसू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जे भागीदारीत आहेत त्यांची प्रगती होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. तसेच तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होऊ शकते. लग्नाशी संबंधित चालू अडथळे दूर होऊ शकतात. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.

धनु

राहूचे भ्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. या काळात काही मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाच्या नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. त्याचवेळी जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कुंभ

राहूचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते. या काळात व्यवसाय आणि नफा वाढू शकतो. तसेच, आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा दिसून येईल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. भागीदारीच्या कामात प्रगती होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तसेच प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णयदेखील घेऊ शकता. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)