Rahu- Ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, केतू आणि राहू ग्रहांना छाया ग्रहांची पदवी देण्यात आली आहे. हे ग्रह सुमारे १८ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. यात केतू सध्या कन्या राशीत तर राहू मीन राशीत भ्रमण करत आहे. पण, १२ तासांनंतर केतू सिंह राशीत प्रवेश करेल आणि राहू मीन राशीत प्रवेश करेल. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण, १२ पैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांना राहू-केतू गोचरमुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पण, कोणत्या राशींना हा लाभ होईल जाणून घेऊ…
मकर
राहू-केतू गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती मजबूत राहू शकते, आर्थिक गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळू शकते. यावेळी तुमचे संवाद कौशल्य सुधारेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. दुसरीकडे संशोधनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू-केतू गोचर फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. देशात आणि परदेशात प्रवासाची संधी चालून येईल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. त्याच वेळी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल आणि तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
वृषभ
राहू-केतू गोचर वृषभ राशीसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला कामात आणि व्यवसायात प्रगती साधता येईल. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल, तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तसेच बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.