Rahu Ketu Transit November 2025: आता पुन्हा एकदा ग्रहांची हालचाल बदलणार असून, नोव्हेंबरच्या शेवटी राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचा नक्षत्रबदल होणार आहे. हा बदल अनेक राशींच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो, असा उल्लेख ज्योतिषशास्त्रात आढळतो. हा नक्षत्र परिवर्तन कोणालातरी श्रीमंतीकडे नेईल, तर काहींसाठी तो आत्मपरीक्षणाचा काळ ठरू शकतो.

राहू-केतू नक्षत्र परिवर्तन कधी आणि कुठे?

पंचांगानुसार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी राहू आपलं स्थान बदलेल आणि तो पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून बाहेर पडून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करील. त्याच वेळी केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून दुसऱ्या चरणात सरकणार आहे. राहू आणि केतू हे छाया ग्रह नेहमीच उलट्या दिशेने भ्रमण करतात आणि त्यांची चाल ही भविष्याचे संकेत देणारी मानली जाते.

या बदलामुळे देश, समाज व वैयक्तिक जीवनावर सूक्ष्म परिणाम दिसू शकतात, असं ज्योतिषांनी म्हटलं आहे. पण विशेष म्हणजे या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. त्यामुळे आर्थिक स्थैर्य, नवी संधी व प्रगतीचे संकेत मिळू शकतात. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

तूळ : उघडतील भाग्याचे दरवाजे!

राहू-केतूच्या या नक्षत्रबदलाचा तूळ राशीवरील प्रभाव अत्यंत सकारात्मक मानला जातो. या काळात तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, धनलाभाचे नवे मार्ग खुलतील. नोकरी किंवा व्यवसायात चांगले परिणाम दिसतील. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. घरगुती आयुष्यातही आनंदाचे क्षण वाढतील आणि कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. राहू-केतूचा हा कालखंड तूळ राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दार उघडणारा ठरू शकतो, असं ज्योतिषीय संकेत सांगतात.

धनू : परदेश प्रवासाचे आणि लाभाचे योग!

धनू राशीसाठी हा नक्षत्रबदल उत्साही संकेत घेऊन येतो. या काळात धनवृद्धी आणि व्यवसायात प्रगतीचे योग दिसून येतात. बराच काळ अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा प्रवासाची इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक ताण कमी होईल. दाम्पत्य जीवनात सौहार्द राहील, तर कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फलदायी ठरू शकतात. मुलांच्या शिक्षण आणि करिअर क्षेत्रातही आशादायक परिणाम दिसतील.

मकर : करिअरमध्ये झपाट्याने वाढ!

राहू-केतूचा हा नक्षत्रबदल मकर राशीसाठी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या शुभ मानला जातो. या काळात पदोन्नतीचे योग दिसू शकतात. नव्या प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी हा कालावधी योग्य ठरू शकतो, ज्यासाठी ते बऱ्याच काळापासून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवी संधी घेऊन येईल. भाग्याची साथ लाभेल आणि तुमची सामाजिक प्रतिमा अधिक दृढ होईल. गुंतवणूक, नवे व्यवहार आणि निर्णय घेताना थोडं सावध राहणं योग्य, असंही ज्योतिष सांगतात.

एकंदरीत काय म्हणतं ज्योतिष?

२३ नोव्हेंबरचा हा ग्रहबदल काहींसाठी आर्थिक स्थैर्य आणि नवी भरारी घेऊन येऊ शकतो. मात्र, हे सर्व अंदाज ज्योतिषशास्त्रीय गणनांवर आधारित असून, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीनिहाय वेगळे असू शकतात. पण, नशीब उजळण्याची ही शक्यता अनेक राशींच्या लोकांमध्ये नवी उत्सुकता निर्माण करणारी आहे विशेषत: तूळ, धनू व मकर राशींच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधीचा संकेत देतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)