Rajyog Benefits to Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलतात (गोचर करतात) आणि त्यातून शुभ योग व राजयोग तयार होतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसतो.
१३ सप्टेंबरला मंगळ तूळ राशीत गेले आहेत आणि १७ ऑक्टोबरला सूर्यही त्याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि मंगळाची युती होऊन आदित्य-मंगळ राजयोग तयार होईल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळेल आणि धन-संपत्तीमध्ये मोठी वाढ होईल. चला तर मग पाहू या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…
तूळ राशी (Libra Horoscope)
आपल्यासाठी आदित्य-मंगळ राजयोग चांगला ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत लग्नभावावर बनेल. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. नवीन लोकांशी ओळखी होतील, ज्या पुढे फायदेशीर ठरतील. या काळात तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. विवाहितांसाठी दांपत्य जीवन सुखी राहील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात मोठा फायदा होईल आणि अडकलेले कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांनाही आर्थिक लाभ होऊ शकतो.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुमच्यासाठी आदित्य-मंगळ राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत ११व्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात. पैशाबद्दलच्या इच्छा पूर्ण होतील. गुंतवणुकीतूनही फायदा होईल. या काळात व्यवसायात लाभ होईल आणि धनवाढ होईल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. तसेच मुलांबद्दल शुभ वार्ता मिळू शकते.
मकर राशी (Capricorn Horoscope)
तुमच्यासाठी आदित्य-मंगळ राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे काम व व्यवसाय चमकतील. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल आणि व्यवसायाचा विस्तार होईल. या काळात वडिलांशी संबंध चांगले राहतील. तसेच नोकरीत इन्क्रिमेंट आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)