Dhan Rajyog Zodiac Signs: यंदा दिवाळीचा सण सोमवार, २० ऑक्टोबर या शुभ दिवशी साजरा होणार आहे. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन, गणेशपूजन आणि संपत्तीचं स्वागत केलं जातं. पण, या वर्षीची दिवाळी केवळ पारंपरिक नाही, तर आकाशात घडणाऱ्या ग्रहयोगांमुळे अत्यंत विशेष मानली जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी शनिदेवाची शुभ दृष्टी सर्व ग्रहांवर पडणार असून, त्यामुळे एक दुर्मीळ ‘धन राजयोग’ तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिदेवाला कर्मफळदाता व न्यायप्रिय देवता म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्याची दृष्टी जर शुभ ठरली, तर मेहनती लोकांना फळ मिळण्याचा काळ सुरू होऊ शकतो. या दिवाळीत शनिदेवाच्या या शुभयोगाचा प्रभाव काही राशींवर विशेषतः अनुकूल पडू शकतो, असं मानलं जातं. पाहूया, कोणत्या राशींच्या लोकांच्या बाबतीत संपत्ती, सन्मान व प्रगतीचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो.
शनी महाराज धन राजयोग निर्माण करणार! शनी महाराज देतील पैसा?
वृषभ (Taurus)
शनीचा हा धनयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी स्थैर्य आणि उन्नतीचं दार उघडू शकतो. बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुने आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळू शकतो. नोकरीत बढती किंवा पगारवाढीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. घरात समाधान आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
मिथुन (Gemini)
हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी संघर्षानंतरच्या सुखाचा क्षण ठरू शकतो. आतापर्यंतचा ताण कमी होऊन धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलू शकतात. प्रॉपर्टी किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. कामात तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि सन्मान मिळू शकतो.
मकर (Capricorn)
हा कालखंड मकर राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतो. अचानक पैशांचा लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी किंवा मोठा सौदा लाभदायक ठरू शकतो. समाजात आणि कुटुंबात प्रतिष्ठा वाढण्याचा काळ दिसतो.
या दिवाळीत शनिदेवाच्या या दुर्मीळ शुभ योगामुळे काही राशींवर नशिबाचा उजेड पडण्याची शक्यता आहे. प्रयत्न, संयम व सकारात्मक दृष्टी ठेवली, तर भाग्य स्वतःहून साथ देईल, अशी ज्योतिषीय शक्यता व्यक्त केली जात आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)