Chanakya Niti: आयुष्यात ज्ञानाला खूप महत्त्व दिले जाते. जो व्यक्ती आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करतो तोच श्रेष्ठ ठरतो. पण असे ज्ञान मिळवण्यासाठी एका महान व्यक्तीचे मार्गदर्शन आश्यक असते. त्यांचे सुविचार आपल्या आयुष्याला यशाच्या दिशेने जाण्यासाठी मदत करतात आणि भरपूर ज्ञान मिळविता येताय असेच एक मार्गदर्शक म्हणजे आचार्य चाणक्य ज्यांच्या नीतींचे पाल करून मगधमध्ये मौर्य वंशाची स्थापना केली होती. आचार्य चाणक्य यांच्याकडे राजनीतीसह मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीचे देखील ज्ञान होते.एवढंच नव्हे तर आयुष्यातील विविध विषयांबाबत त्यांना सविस्तर ज्ञान त्यांच्याकडे होते.आजच्या काळातही आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या विविध नीती तरुणांचे मार्गदर्शन करतात. चाणक्य नीतीच्या या भागात मुलांनी नेहमी संस्कारी किंवा चांगले का असावे याचे महत्त्व जाणून घेऊ या.
मुलगा संस्कारी असण्याचे महत्त्व ?
एकेनापि सुवर्ण पुष्पितेन सुगन्धिता ।
वसितं तद्वनं सर्वं सुपुत्रेण कुलं यथा ।।
वृक्षाचे उदाहरण देताना आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ज्याप्रमाणे जंगलात एक सुंदर आणि सुवासिक फुलांचे झाड आपला सुगंध दूरवर पसरवते, त्याचप्रमाणे एक संस्कारी किंवा चांगला मुलं संपूर्ण कुळाचे नाव मोठे करतो. त्यामुळे प्रत्येक मुलाने आपल्या कुटुंबाचा सन्मान लक्षात घेऊन काम केले पाहिजे. त्यांची छोटीशी चूकही मोठे परिणाम घडवू शकते.
हेही वाचा- वडील आणि मुलामध्ये नाते कसे असावे? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
एकेन शुष्कवृक्षेण दह्यमानेन वह्निना ।
दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा ।।
चाणक्य नीतीच्या या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी झाडाचे उदाहरण देऊन सांगितले आहे की, ज्याप्रमाणे सुकलेल्या झाडाला आग लागल्यामुळे संपूर्ण जंगलात आग पसरते, त्याचप्रमाणे एका कुपुत्रामुळे (संस्कार नसलेले मुलं) कुटुंबाने वर्षानुवर्षे कमावलेला मान-सन्मान मातीमोल होतो.