Baba Vanga Prediction 2025: पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर नवीन निर्बंध लादत आहेत. हा वाढता तणाव पाहून संपूर्ण जग चिंतेत आहे. संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनीही दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. पण, वाढता तणाव पाहून युद्धाची भीतीही वाढत चालली आहे.
या सर्व घटनाक्रमांदरम्यान, भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध बाबा वेंगा यांची भाकिते देखील चर्चा विषय ठरत आहेत. जगभरात असे लाखो लोक आहेत, जे भविष्य माहीत असल्याचा दावा करतात. पण, ज्यांची भाकिते इतरांपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरतात त्यांनाच जगभरात ओळखले जाते. अशीच एक भविष्य सांगणारी व्यक्ती म्हणजे नेत्रहीन बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा ऊर्फ बाबा वेंगा. बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती, त्यात अनेक देश नष्ट होऊ शकतात. पण, त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांनी या आधी केलेल्या भविष्यवाण्यांचे काही प्रमाणात खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांच्या मते, वर्ष २०२५मध्ये युरोपच्या कित्येक देशांमध्ये मोठा संघर्ष होऊ शकतो ज्यामुळे संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होईल.
बाबा वेंगा यांचे हे भाकीत खरे ठरले आहे.
बाबा वेंगाने अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत केले होते, त्यापैकी काही आधीच खरे ठरल्या आहेत. त्यांनी २०२५ मध्ये विनाशकारी युद्धाची भविष्यवाणी केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी २०२० मध्ये कोरोना साथीबाबतही भविष्यवाणी केली होती. बाबा वांगा यांच्या मते, २०२४ मध्ये संपूर्ण जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, जे कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आधीच घडले आहे. या काळात अनेक देशांच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली होती.
याशिवाय बाबा वांगा यांनी २००४ चा भूकंप, ९/११ हल्ला आणि राजकुमारी डायनाच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली. त्यांच्या भविष्यवाण्या आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि भाकितांचा संबंध काय?
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे जगभरात चिंतेचे कारण बनले आहे. जर हा तणाव दूर झाला नाही तर दोन्ही देशांमधील युद्धाची शक्यता आणखी वाढू शकते. बाबा वांगाच्या भविष्यवाण्या सध्या जगभरात चर्चेचा विषय आहेत, कारण त्यांनी २०२५ मध्ये होणाऱ्या विनाशकारी युद्धाबद्दल सांगितले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाद बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि आता हा वाद सोडवणे आणखी अवघड झाले आहे. जर हा तणाव असाच वाढत राहिला तर २०२५ साठी बाबा वांगाने भाकीत केल्याप्रमाणे महायुद्धाची शक्यता आणखी वाढू शकते.
भविष्यवाणीत युरोप आणि मानवतेसाठी धोका
बाबा वांगाच्या भाकितांनुसार, युरोपातील अनेक देशांमध्ये भयंकर लढाई होऊ शकते, जी केवळ त्या देशांपुरती मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगावर परिणाम करेल. युद्धामुळे मानवतेचा नाश होऊ शकतो आणि हे संपूर्ण जगासमोर एक मोठे आव्हान निर्माण करू शकते. रशिया-युक्रेन युद्ध हे याचे एक उत्तम उदाहरण आहे, ज्याचा परिणाम केवळ युरोपवरच नाही तर संपूर्ण जगावर झाला आहे.
याशिवाय, बाबा वांगा यांनी भाकीत केले होते की २०४३ मध्ये युरोपमध्ये मुस्लिम धर्माच्या अनुयायांचे राज्य स्थापित होईल, जे अनेक लोकांसाठी चिंतेचा विषय असू शकते.