Sankashti Chaturthi Vrat 2024: पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. या संकष्टी चतुर्थीला सकट चौथ, तिलकुट, या नावांनी देखील ओळखले जाते. शास्त्रानुसार, पौष महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी निर्जल व्रत करण्याची परंपरा आहे. जी व्यक्ती या दिवशी व्रत करुन श्रीगणेशाची पूजा करते, त्याची सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. तसेच जीवन सुख-समृद्धीने भरून जाते, असा समज आहे. या वर्षी संकष्टी चतुर्थी २९ जानेवारीला असणार आहे. याशिवाय या दिवशी चांगले योगही जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी तिथी शुभ वेळ, चंद्रोदयाची वेळ आणि मंत्र…

संकष्टी चतुर्थी २०२४ तारीख, शुभ वेळ

पंचांगानुसार पौष महिन्याची चतुर्थी २९ जानेवारीला सकाळी ६.१० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ३० जानेवारी रोजी सकाळी ८.५४ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीला आधार मानून २९ जानेवारीलाच संकष्टी चतुर्थी असणार आहे.

चंद्रोदय वेळ

रात्री ९.१० वाजता असेल. (देशाच्या वेळवेगवेळ्या भागात चंद्रोदयाची वेळ वेगळी असते) यात मुंबईत रात्री ९.३२ वाजता, नागपूर रात्री ९.०६ वाजता असेल.

‘हे’ विशेष योग तयार होत आहेत

वैदिक दिनदर्शिकेनुसार, या वर्षी संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये शुक्र, मंगळ आणि बुधपासून त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शोभन योगही तयार होत असून, याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. तसेच या योगात पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते असे मानले जाते.

यादिवशी तुम्ही गणपती बाप्पाकडे आयुष्यातील विघ्न दूर करण्याची प्रार्थना करण्यासाठी मंत्राचा जप करु शकतात.

संकष्टी चतुर्थी मंत्र

१) ‘गणपूज्यो वक्रतुंडा एकादशत्री त्र्यंबकः।

नीलग्रीवो लंबोदारो विकतो विघ्रराजक:।

धुम्रवर्णोन् भालचंद्रो दशमस्तु विनायक:।

गणपर्तिहस्तिमुखो द्वादशरे यजेद्गणम् ।

२) ओम श्री गण सौभ्ये गणपतये वर वरद सर्वजनम् मे वशमनाय स्वाहा.

३) ओम हस्ति पिशाची लिखित स्वाहा.

४) ओम गं क्षिप्रप्रसादाय नमः।

५) ओम श्री ह्रीं क्लीम ग्लाँ गं गणपत्ये वर वराडे नमः

६) ओम तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डया धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात्।