Sankashti Chaturthi Chandroday 29th January 2024: पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात उद्या म्हणेजच २९ जानेवारीला संकष्टी चतुर्थी असणार आहे. दिनदर्शिकेनुसार, चतुर्थी तिथी २९ जानेवारीला सकाळी ६:१० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारीला सकाळी ८:५४ वाजता समाप्त होईल. यावेळी संकष्टी चतुर्थीचा उपवास २९ जानेवारीला आहे. तसेच या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.१० वाजता असेल.वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, तब्बल १०० वर्षांनी या ‘सकट चौथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ग्रहांचे काही योग जुळून आले आहेत. हे योग अत्यंत दुर्मिळ मानले जात असून यामुळे तीन राशींना येत्या काळात गणपती बाप्पांकडून मोदकासारखी गोड बातमी मिळण्याचे संकेत आहेत.

१०० वर्षांनी संकष्टीला कोणता योग जुळून येत आहे?

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, १०० वर्षांनी सकट चौथ नामक या संकष्टी चतुर्थीला शुभन व त्रिगही योग जुळून येतोय. धनु राशीत सध्या शुक्र, मंगल व बुध ग्रह एकत्र असल्याने त्रिगही योग निर्माण होत आहे. यामुळे, धनलाभ, कामामध्ये प्रगती व वैवाहिक सौख्य मिळवून सुख अनुभवण्याची संधी असलेल्या या तीन राशी कोणत्या हे पाहूया..

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

‘सकट चौथ’ तिथीवर तूळ राशीच्या मंडळींच्या मनातील अनेक इच्छांना मार्ग सापडणार आहे. कामात येणारे अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल तसेच नवीन व्यवसाय व व्यापार करण्याची संधी हाती येईल. भांडवलाच्या समस्या दूर होऊ शकतात. तुम्हाला हितशत्रूंचा त्रास होत होता मात्र आता पूर्ण सत्य समोर आल्याने आपल्याला नक्की काय व कसे करावे याबाबत स्पष्टता येईल. पती पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका. संभाषण आपल्या नियंत्रणात ठेवल्यास येत्या काळात आयुष्यातील गोडवा वाढू शकतो. धनलाभासाठी आवश्यक असणारी मानसिक शांती या कालावधीत आपल्याला प्राप्त हौस शकते.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

१०० वर्षांनी तयार होणारा राजयोग वृश्चिक राशीसाठी गोड बातमी घेऊन येऊ शकतो. तुमच्या वाटेतील आर्थिक अडचणी तुमच्या वाणीच्या माध्यमातून दूर होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीचे लाभ होऊ शकतात. या कालावधीत वाडवडिलांच्या रूपात आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. वाहन खरेदीचा योग आहे. मुलांच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडू शकते ज्यामुळे तुमच्या घरात सुख- आनंद, सौख्य- समृद्धी यांची वाढ होऊ शकते.

हे ही वाचा << १२ वर्षांनी महायुतीत येणार दोन बलाढ्य ग्रह! सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीसाठी सुद्धा येत्या काळात धनलाभाचे योग तयार होत आहेत. आपल्याला कामाच्या निमित्त परदेशवारीची किंवा विमान प्रवासाची संधी मिळू शकते. धनलाभाच्या कक्षा रुंदावू शकतात. मान- सन्मान वाढल्याने मनातील समाधानाची भावना प्रबळ होईल. नवीन माणसांची भेट घडेल पण बोलताना तोल ढळू देऊ नका. पटकन विश्वास ठेवणे टाळावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)