ज्योतिष शास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण केल्यानंतर, त्याचा स्वभाव आणि भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे, सामुद्रिक शास्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचे आणि त्यावरील तीळांचे विश्लेषण केले जाते आणि त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितले जाते. शरीरावर तीळ कुठे आहे, यावरही बरेच काही अवलंबून असते. सामुद्रिक शास्त्र हे देखील सांगते की ज्या लोकांच्या खांद्यावर तीळ असतो ते खूप खास असतात. तसंच त्यांची काही खासियत असल्याचंही म्हटलं जातं. जाणून घेऊया…

उजव्या खांद्यावर तीळाचा अर्थ:

समुद्रिक शास्त्र सांगते, की ज्या लोकांच्या उजव्या खांद्यावर तीळ असतो ते लोक खूप आनंदी असतात. हे लोक कुठेही गेले तरी वातावरण आनंदी करतात. कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती त्यांच्यावर फार लवकर परिणाम करू शकत नाही. या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, या लोकांचे छंद खूप महाग आहेत आणि ते त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात.

डाव्या खांद्यावर तीळाचे फायदे काय आहेत?

 असे म्हणतात, की ज्या लोकांच्या डाव्या खांद्यावर तीळ असतो, ते शांत असतात. त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य साहसात घालवायचे असते. अशा लोकांचा असा विश्वास आहे की जीवनात सर्वकाही केले पाहिजे. हे लोक योग्य-अयोग्य याचा फारसा विचार करत नाहीत. हे लोक देखील दूरदर्शी आहेत. तसेच हे लोक कष्टाळू असतात. ते सर्व काम वेळेवर पूर्ण करतात. त्यांना कामात उशीर झालेला आवडत नाही.

मनातील गोष्टी लपवतात…

सामुद्रिक शास्त्र सांगते की ज्या लोकांच्या खांद्याच्या मागच्या बाजूला तीळ असतो ते आपल्या मनातील गोष्टी लपवून ठेवतात. अशा लोकांना लोकांशी बोलणे आवडत नाही. हे लोक वेगळं बोलतात वेगळं काम करतात. आयुष्यात अचानक निर्णय घेऊन ते सर्वांना आश्चर्यचकित करतात. त्यांना साधे जीवन जगणे आवडते आणि या लोकांचा पैसे जोडण्यावरही विश्वास असतो.