scorecardresearch

सामुद्रिक शास्त्र: नखावर तीळ असलेली व्यक्ती कशी असते, जाणून घ्या सविस्तर

ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखावर तीळ असतो, ती व्यक्ती खूप प्रभावशाली असते.

(फोटो संग्रहित)

समुद्र ऋषी हे सामुद्रिक शास्त्राचे लेखक आहेत. या शास्त्रात त्यांनी शरीराच्या अवयवांची रचना आणि त्यावर बनवलेल्या खुणा, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो, याविषयी माहिती दिली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागांप्रमाणे नखांच्या तिळांवरून माणसाचा स्वभाव आणि वागणूक कळू शकते, असे म्हणतात. नखांवरील तीळ व्यक्तीबद्दल अनेक रहस्य सांगण्यास सक्षम असतात, असं मानलं जातं.

अंगठ्याच्या नखावर तीळ –

ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखेवर तीळ असतो, ती व्यक्ती खूप प्रभावशाली असते, असं म्हटलं जातं. ही व्यक्ती जिथे जाते तिथे लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. असे लोक भविष्यात नेते म्हणून काम करतात, असंही म्हटलं.

तर्जनीवर तीळ –

तर्जनीच्या नखावर तीळ असल्यास व्यक्ती भावूक बनते, असं म्हटलं जातं. अशा व्यक्तीच्या भावनिकतेचा लोक फायदा घेतात आणि त्यांच्याकडून काम काढून घेतात. अशा लोकांनी जास्त मित्र बनवू नये. कारण त्यांच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते.

मधल्या बोटाच्या नखावर तीळ –

मधल्या बोटाच्या नखावर तीळ असल्यास व्यक्तीची बुद्धिमत्ता वाढते. असे म्हणतात की, अशा लोकांमध्ये शक्तीची कमतरता असते. हे लोक खूप नखरे करतात. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचा राग येतो. त्यांचे खूप सारे मित्र असतात.

अनामिकेच्या नखावर तीळ –

सामुद्रिकशास्त्रात असे मानले जाते की अनामिकेच्या नखावर तीळ असलेला मनुष्य प्रसन्न असतो. असे लोक हुशार असतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीची लवकर माहिती होते.

करंगळीच्या नखावर तीळ –

ज्या लोकांच्या करंगळीच्या नखेवर तीळ असतो ते स्वभावाने खूप चंचल असतात. या लोकांचं मन कुठेही लागत नाही.  अशा लोकांना खूप मित्र असतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samudrik shastra know the meaning of mole on nails hrc