Aries To Pisces Daily Horoscope, 14 June 2025 : १४ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होईल. दुपारी १ वाजून १३ मिनिटांपर्यंत ब्रम्ह योग जुळून येईल. दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज संकष्टी चतुर्थी असणार आहे. आज बाप्पा तुम्हाला मोदकासारखी गोड बातमी देणार का जाणून घेऊया…
१४ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Ajche Rashi Bhavishya, 14 June 2025)
मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पटवून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने निर्णय घेऊ नका.
कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.
मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर