Horoscope Today In Marathi 20 September 2025 : आज २० सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावास असणार आहे. आज शुभ योग जुळून येईल आणि फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज सर्वपित्री अमावस्या असणार आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. तर आजचा दिवस तुमच्या राशीचा कसा जाणार जाणून घेऊयात…
२० सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 20 September 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्यांशी मतभेदाची शक्यता.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी॰ एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
दुसर्यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर