Surya Shani Kendra Yog Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांच्या बदलाला किंवा संक्रमणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शनी आणि सूर्य पिता-पुत्र असले तरी ते एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत. आता २३ जून २०२५ रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे, ज्याचा काही राशींवर मोठ्या प्रमाणात थेट परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सूर्य आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह ९० अंशाच्या कोनात येणार आहेत, ज्यामुळे ‘केंद्र योग’ तयार होईल. हा योग अत्यंत प्रभावशाली असून तो पद-प्रतिष्ठा, धनलाभ, विदेश प्रवास आणि समाजात मान-सन्मान मिळवून देणारा ठरू शकतो. तर मग चला जाणून घेऊ कोणत्या तीन भाग्यशाली राशींना या योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे:
शनी-सूर्य योग ‘या’ राशींना देणार पैसा?
मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनी केंद्र योग अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो. या काळात या राशीच्या लोकांना धनवान होण्याची संधी लाभू शकते. विदेश प्रवास किंवा परदेशात स्थायिक होण्याची संधी मिळू शकते. खर्च वाढेल; पण त्याचबरोबर उत्पन्नही वाढतच राहू शकते. नोकरदार वर्गातील लोकांच्या कामाची चांगली प्रशंसा होऊ शकते. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे, समाजात मान-सन्मान वाढू शकतो. आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक वातावरण सुखद असेल.
कर्क (Cancer)
या राशीसाठी हा योग सर्व अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. अडलेला पैसा परत मिळू शकतो. अचानक धनप्राप्ती किंवा गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवास संभवतो, जो फायदेशीर ठरू शकतो. शेअर मार्केटमधूनही फायदा होऊ शकतो. सर्व प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. विवाहेच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी हा केंद्र योग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते. करिअरमधील अडथळे दूर होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. व्यापारात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामात वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि त्यामुळे यश निश्चित मिळेल. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांमुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)