Shani Nakshatra Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांमधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो. त्याचा अर्थ असा की, मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. शनीची चाल जेव्हा बदलते तेव्हापासून हे चांगले किंवा वाईट परिणाम स्पष्ट दिसू लागतात. दरवर्षी शनी जयंती ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनी देवाचा जन्म झाला होता, असे मानले जाते. सूर्य व छाया यांच्या पुत्राचा म्हणजेच शनी देवाची जयंती यंदा २७ मे रोजी साजरी होणार आहे. शनी देवाने २८ एप्रिल २०२५ रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. आता शनी २७ मे रोजी शनी जयंतीला उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते. धन-दौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते. अशा या नशीबवान राशी कोणत्या आणि त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो ते पाहू…

शनी देव या राशींना देणार बक्कळ पैसा, सुरू होतील चांगले दिवस?

कर्क

शनी देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले दिवस येऊ शकतात. कर्क राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन पर्याय मिळू शकतात. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.

कन्या

शनी देवाच्या कृपेने कन्या राशीच्या मंडळीचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. नवीन नोकरीच्या योगासह व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. पैशात लक्षणीय वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही धार्मिक यात्रादेखील करू शकतात. या काळात जास्त पैसे कमवू शकाल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. भौतिक सुख लाभू शकते. या राशीसाठी व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. नशिबाची खूप साथ मिळू शकते.

तूळ

शनी देवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडून येऊ शकतात. अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणूकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी शुभ आहे. कामात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन संधी मिळू शकेल.

कुंभ

शनी देवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. वाहने आणि मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. भावा-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)