Saturn Rahu conjunction 2025 in Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाधीश शनी आणि मायावी ग्रह राहू यांची मीन राशीत युती होणार आहे. त्यामुळे पिशाच योग तयार होईल. २९ मार्च रोजी शनी देवाच्या मीन राशीतील गोचरमुळे हा योग तयार होईल. सध्या राहू मीन राशीत स्थित आहे. अशा परिस्थितीत या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. त्यासह या राशींच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यांचे आरोग्य बिघडण्याचीही शक्यता आहे. पण, कोणत्या राशी अडचणीत सापडू शकतात ते जाणून घेऊ…

सिंह (Leo Zodiac)

पिशाच योग सिंह राशीसाठी हानिकारक ठरू शकतो. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच तुमचे नातेसंबंध थोडे बिघडू शकतात. तुम्ही काही मोठ्या वादविवादातदेखील अडकू शकता. म्हणून कोणत्याही वादात पडाल तेव्हा कोणाला उलट उत्तर देऊ नका. या काळात तुम्हाला एखाद्या अडचणीमुळे कोणाकडून तरी पैसे उधार घेण्याची गरज भासू शकते. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवू शकतो.

कन्या (Virgo Zodiac)

पिशाच योगाची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरू शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते. कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच वेळी जे लोक कोणाबरोबर भागीदारीमध्ये काम करतात, त्यांना खूप काळजी घ्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनू (Sagittarius Zodiac)

पिशाच योगाची निर्मिती धनू राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. यावेळी तुमच्या आईबरोबरचे नाते थोडे तणावपूर्ण असू शकते आणि त्यामुळे कुटुंबातही थोडे तणावपूर्वक वातावरण राहू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. तसेच, विवाहित लोकांचे त्यांच्या सासू-सासऱ्यांशी थोडे कटू संबंध असू शकतात.