Shani Dev Vakri Impact in Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ-अशुभ फळ देतात. न्यायाचे देवता मानले जाणारे शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत. शनिदेव सर्वात संथगतीने चालणारा ग्रह असून एका राशीत तब्बल अडीच वर्षे वास्तव्य करतो. त्यामुळे शनीचा प्रभावही दीर्घकाळ टिकणारा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.२४ वाजता मीन राशीत वक्री होणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल १३८ दिवस ते वक्री अवस्थेत राहणार असून २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा मार्गी होतील.
शनि जेव्हा उलट दिशेने चालतो, तेव्हा त्याला “वक्री” म्हणतात. अनेकदा वक्री ग्रहांचे परिणाम कमकुवत होतात असं मानलं जातं. मात्र काही वेळा याच वक्री स्थितीत ग्रह शुभ परिणामही देतात. शनीच्या वक्री होण्याने तीन राशींच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलणार आहे, त्यांना जीवनात सुख प्राप्ती होऊ शकते, चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
वक्री शनीच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब फळफळणार!
मेष (Aries)
मेष राशीसाठी शनीचे वक्री होणे फायदेशीर ठरु शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. नातेवाईकांशी मतभेद दूर होऊ शकतात. आरोग्य सुधारेल आणि परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांवर शनिदेवाचा कृपा होऊ शकते. या राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. शेअर बाजारातून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांची या काळात आर्थिक स्थिती सुधारु शकते. तुम्हाला पगारवाढीसोबतच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. घरात सुख-शांती नांदेल.
मीन (Pisces)
शनी या राशीतच वक्री होत असल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. व्यवसायात नफा वाढू शकतो. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला कुठेतरी बाहेर जावे लागू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. घरात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी धनलाभाचे योग असून बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)