September Festivals 2025 List : सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिवस खूप खास मानला जातो. कारण – सप्टेंबर महिन्याची सुरुवातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने होत आहे. त्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी असेल. मग नंतर पितृ पक्ष आणि शारदीय नवरात्र, अशा महत्त्वाच्या सणांची सुरुवात होईल. इतकेच नाही, तर सप्टेंबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असेल. कॅलेंडरवर नजर टाकल्यास, सप्टेंबरमधील काही दिवस भाद्रपद महिन्याच्या अंतर्गत येतील आणि उर्वरित दिवस आश्विन महिन्याच्या अंतर्गत येतील. तर, सप्टेंबर महिन्यातील सर्व व्रते आणि सण, ग्रहणाच्या तारखा तुम्ही बातमीमध्ये दिलेल्या यादीमध्ये पाहू शकता…
- मंगळवार, २ सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन
- बुधवार, ३ सप्टेंबर – परिवर्तिनी एकादशी
- गुरुवार, ४ सप्टेंबर – वामन जयंती
- शुक्रवार, ५ सप्टेंबर – शिक्षक दिन, प्रदोष व्रत
- शनिवार, ६ सप्टेंबर – अनंत चतुर्दशी
- रविवार, ७ सप्टेंबर – स्नान-दान पौर्णिमा, पितृ पक्ष सुरू, चंद्रग्रहण
- बुधवार, १० सप्टेंबर – संकष्टी चतुर्थी
- रविवार, १४ सप्टेंबर – मध्याष्टमी श्राद्ध
- बुधवार, १७ सप्टेंबर – इंदिरा एकादशी,
- शुक्रवार, १९ सप्टेंबर – प्रदोष व्रत
- रविवार, २१ सप्टेंबर – पितृ मोक्ष, दर्श अमावस्या, सूर्यग्रहण
- सोमवार, २२ सप्टेंबर – शारदीय नवरात्री, घटस्थापना
- गुरुवार, २५ सप्टेंबर – विनायकी चतुर्थी
- शुक्रवार, २६ सप्टेंबर – उपांग ललिता व्रत
- मंगळवार, ३० सप्टेंबर – महाष्टमी व्रत
गणेश उत्सव – गणेश उत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असला तरीही गणेश विसर्जन ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होईल.
श्राद्ध पक्ष २०२५ – श्राद्ध पक्ष ७ सप्टेंबर म्हणजे रविवारपासून सुरू होईल. या दिवशी चंद्रग्रहण आहे. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पितृ पक्ष संपेल. या दिवशी सूर्यग्रहण आले.
शारदीय नवरात्र २०२५ – २२ सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.