Shani Triekadash Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही काळानंतर आपली रास बदलतो. याचा परिणाम १२ राशींवर आणि देश-दुनियावरही दिसून येतो. या ग्रहांपैकी शनी हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी एका राशीत सुमारे दोन ते अडीच वर्षे राहतो, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो.
सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. शनी नेहमी आपला अंश बल बदलत असतो आणि त्यामुळे इतर ग्रहांसोबत मिळून काही शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. याच प्रकारे, श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर शनी आणि अरुण यांच्या संयोगाने त्रिएकादश योग तयार होत आहे. हा विशेष योग काही राशींना विशेष लाभ देऊ शकतो. चला तर मग पाहूया, कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १२ ऑगस्ट रोजी शनी आणि अरुण एकमेकांपासून ६० अंशांच्या अंतरावर असतील, त्यामुळे त्रिएकादश योग तयार होत आहे. याला लाभ दृष्टि असेही म्हणतात.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac Sign)
या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं. या राशीत शनी पाचव्या भावात असतील. त्यामुळे जीवनात आनंद येऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायातही फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या काळात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. परदेशात जाण्याचेही योग आहेत. तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)
या राशीच्या लोकांसाठी शनी-अरुण यांचा त्रिएकादश राजयोग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या दुसऱ्या भावात शनी वक्री अवस्थेत आहे. या काळात लोकांना छोट्या छोट्या प्रवासाचे योग येऊ शकतात, जे फायद्याचे ठरतील. अध्यात्माची आवड वाढेल आणि तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. भावंडांशी नाते चांगले होईल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील. जीवन हळूहळू स्थिर आणि संतुलित होईल.
कर्क राशी (Cancer Zodiac Sign)
या राशीच्या लोकांसाठी त्रिएकादश योग खूप लाभदायक ठरू शकतो. या काळात यश आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग उघडू शकतात. जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबत लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे, जे फायदेशीर ठरतील. अचानक पैशाचा लाभ होण्याचे योग आहेत. उत्पन्न झपाट्याने वाढेल आणि कामात आत्मविश्वास व दृढता दिसून येईल. मात्र, या शुभ काळात वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची नियमित तपासणी व काळजी घेणे फायदेशीर ठरेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)