Shani-Budh Make Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला न्याय आणि कर्मफळदाता म्हटले जाते. तर, बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुध आणि शनी एकमेकांपासून १२० डिग्रीवर होते. ज्यामुळे नवमपंचम राजयोग निर्माण झाला.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात किंवा एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतात तेव्हा नवपंचम राजयोग निर्माण होतो. या योगाच्या प्रभावाने आयुष्यात सुख-समृद्धी आणि संपत्ती येते.

नवमपंचम राजयोग ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल.

मकर (Makar Rashi)

हा शुभ राजयोग मकर राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)