Shani Budh Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर वक्री किंवा मार्गी होत असतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. जुलै महिन्यात कर्मफळ दाता शनीदेव आणि व्यापारदाता बुध वक्री होत आहे, म्हणजे ते आता उलट चाल करणार आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. पण, १२ पैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यावर शनी-बुधाची विशेष कृपा होईल. तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. पण, कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांना शनी आणि बुध ग्रहाची वक्री चाल सकारात्मक ठरू शकते. या काळात मकर राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय, शनीदेवाची वक्री चाल करिअरच्या बाबतीत शुभ ठरू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉस आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राखता येतील. शौर्यात वाढ होईल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत राहील. त्याच वेळी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना शनी-बुध वक्री फलदायी ठरू शकते. या काळात त्यांना नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. त्याचबरोबर, नोकरी करणाऱ्यांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. तुमच्या राशीतून नवव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शनीदेव आहे, त्यामुळे यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते, तसेच परदेशातून नफा मिळण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाची वक्रदृष्टी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायानिमित्त तुम्ही प्रवास करू शकता. त्याचवेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल.