Shani Dev : शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात कारण शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मनुसार फळ देतो. शनिची प्रत्येक चाल लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करते. शनि आता कुंभ राशीमध्ये आहे. 11 फेब्रुवारीला शनिदेव अदृश्य होणार आहे. १८ मार्च पर्यंत शनि याच स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वी शनि त्याची चाल बदलणार आहे. शनिच्या या चालचा काही राशींच्या प्रेमजीवनावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, जाणून घेऊ या.
मकर
शनि राशी अदृश्य होणार असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या स्वभावावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या स्वभावात आणि वागण्यात नकारात्मकता आणि आक्रमकपणा दिसून येईल ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यांवर दिसून येईल. त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराबरोबर वाद विवाद निर्माण होऊ शकतात. त्याचे नाते सुद्धा तुटू शकते. त्यांनी जोडीदाराला समजून घ्यावे आणि त्याच्यासाठी वेळ काढावा. यामुळे तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. नाते जपून ठेवणे हे या राशीच्या लोकांसाठी खूप मोठे आव्हान असणार आहे.
कर्क
शनिची ही चाल कर्क राशीच्या प्रेमसंबंधांवर खोलवर परिणाम करू शकते. एकमेकांवर शंका घेणे टाळावे अन्यथा गैरसमज वाढू शकतात. काळजीपूर्वक नाते जपणे गरजेचे आहे. या राशीच्या लोकांनी खूप समजूतदारपणाने वागले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. विवाहित लोकांच्या आयुष्यात सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात.
वृषभ
शनिच्या या चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आपली प्रेम जपायला पाहिजे. हा काळ प्रेमसंबंधासाठी कठीण असणार आहे. अशात या लोकांनी जोडीदारबरोबर वाद घालणे टाळले पाहिजे. कदाचित या राशीच्या लोकांचा ब्रेक अप होऊ शकतो.नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.
धनु
शनिच्या या चालीमुळे धनु राशीची व्यक्ती अडचणीत येऊ शकते. त्यांच्या प्रेम जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जोडीदाराबरोबरचे संबंध बिघडू शकतात. नात्यात तणाव वाढू शकतो. नात्यात वादविवाद होऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जोडीदाराबरोबर बोलताना नीट शब्दप्रयोग करावा. विवाहित लोकांनी सुद्धा त्यांच्या जोडीदाराबरोबर संयमाने वागावे.
टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.