Shani Viprit Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होतो. ज्याचा १२ राशीच्या व्यक्तींवर विविध परिणाम पाहायला मिळेल. नवग्रहात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो.
पंचांगानुसार, शनी २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार असून जून २०२७ पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. दरम्यान, कुंडलीमध्ये सहाव्या, आठव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात गोचर करतो तेव्हा विपरित राजयोग निर्माण होतो. सध्या शनी सहाव्या भावाचा स्वामी होऊन आठव्या भावात गोचर करत आहे. त्यामुळे हा राजयोग निर्माण झाला आहे. या योगाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींवर पडणार राजयोगाचा शुभ प्रभाव
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीसाठी हा राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.
मकर (Makar Rashi)
मकर राशीसाठी देखील हा .राजयोग खूप फायदेशीर असेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)