Shani Dev Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक काळाने राशी बदलत असतात. आपल्या कर्माचे फळ देणारा आणि न्याय देणारा शनी देव १२ मे २०२४ ला सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी शनी पूर्वाभाद्रपदच्या द्वितीय पदावर प्रवेश करणार आहे. शनी देव द्वितीय पदामध्ये १८ ऑगस्ट पर्यंत विराजमान असणार आहे. अशा स्थितीमध्ये नक्षत्राचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पाहायला मिळू शकतो. पण अशा ३ राशी आहेत ज्यांच्या भाग्य उजळणार आहे. तसेच धन-संपत्तीत वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊ या त्या लकी राशी कोणत्या आहेत.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी नक्षत्र परिवर्तन लाभदायी सिद्ध होऊ शकते. या काळात या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच प्रत्येक कामात कुटुंबाच्या सहका्र्य आणि आर्थिक लाभ मिळेल. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच या काळात नोकरी पेशा असलेल्या लोकांची पद्दोन्नती होऊ शकते. तसेच व्यक्तिमत्वमध्ये सुधारणा होईल. हा नक्षत्र बदल करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप चांगला असेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल.
हेही वाचा – Weekly horoscope: ६ मेपासून सुरु होणार राशींचा सुवर्णकाळ! मिळेल बक्कळ पैसा, कसा जाईल तुमचा आठवडा?
वृषभ
शनीदेवाचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायासाठी शुभ ठरू शकते. त्यामुळे या काळात काम-व्यवसायामध्ये यश मिळेल. या काळात नोकरदार लोकांचे पद्दोन्नती होईल आणि पगार वाढ देखील होईल. नव्या नोकरीची संधी देखील मिळू शकते. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो. एखादा व्यावसायिक करार होऊ शकतो ज्यामुळे भविष्यात लाभ होईल. तसेच या काळात वडीलांसह नातेसंबध सुधारतील.
मिथुन
शनी देवाचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल सिद्ध होऊ शकते. त्यामुळे अविवाहित लोकांसाठी यावेळी लग्नाचा योग असण्याची शक्यता आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल. तसेच, या कालावधीत कोणतीही मोठी गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. तुम्ही तुमच्या करिअरच्या दिशेने कितीही पावले टाकाल, ती तुम्हाला यश मिळवून देतील. यावेळी तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.