scorecardresearch

६ मार्च २०२३ पासून ‘या’ पाच राशींना होणार बक्कळ धनलाभ? शनीचा मूळ राशीत उदय देऊ शकतो अपार श्रीमंती

Saturn Rise In Kumbh: ६ ते ९ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत शनी सर्वाधिक सक्रिय असू शकतात. शनी उदय होताच याचा प्रभाव काही राशींवर शुभ ठरणार आहे.

Shani Dev Uday In March 2023 These 5 Zodiac Sign Will Get Huge Money Bank Balance Can Grow Finance Astrology
६ मार्च २०२३ पासून 'या' पाच राशींना होणार बक्कळ धनलाभ? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Dev Uday 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनिदेव अत्यंत संथ गतीने प्रवास करतात त्यामुळेच एखाद्या राशीत शनीचा प्रवेश होताच त्याचा प्रभाव निदान साडे सात वर्ष कायम राहतो. यंदा १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव स्वराशी कुंभमध्ये स्थिर झाले होते त्यानंतर ३० जानेवारीला शनी कुंभ राशीतच अस्त झाले होते. आता इथून पुढे ३५ दिवस शनिदेव अस्त असणार असून ६ मार्च ला शनीचा उदय होणार आहे. ६ ते ९ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत शनी सर्वाधिक सक्रिय असू शकतात. शनी उदय होताच याचा प्रभाव काही राशींवर शुभ ठरणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार कुंभ राशीत शनीचा उदय झाल्यावर ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी मिळणार आहे.

मेष (Aries Zodiac)

मेष राशीसाठी शनीचा उदय लाभदायक ठरू शकतो. आपल्याला सर्वाधिक लाभ हा मानसिक होणार आहे. आपल्याला अनेक समस्या दूर करून मनःशांती अनुभवता येऊ शकते. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला मित्रांच्या मदतीने धनलाभाची मोठी संधी मिळू शकते. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला अन्य शहरात जाऊन राहण्याची संधी मिळू शकते.

मिथुन (Gemini Zodiac)

शनिदेवाचा उदय होताच मिथुन राशीला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या गोचर कुंडलीत शनिदेव नवव्या स्थानी भ्रमण करत स्थिर होतील. हे स्थान भाग्योदय व परदेश वारीचे मानले जाते. त्यामुळे येत्या काळात आपल्याला एखादी परदेश वारी करण्याची संधी नक्कीच मिळू शकते. याशिवाय कोर्टाचे खटले तुमच्या बाजूने लागण्यास सुद्धा शुभ काळ आहे. या काळात आपल्या वडिलांसह नाते सुधारण्यास मदत होऊ शकते.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत शनिदेव कर्मस्थानी स्थिर होणार आहेत त्यामुळे येत्या काळात आपल्याला कर्माचे योग्य फळ मिळण्यास मदत होईल, जर आपण नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच मनाप्रमाणे आवडत्या संधी मिळू शकतील. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. संतती सुखप्राप्तीसाठी मार्चपासून शुभ काळ आहे. तुम्हाला येत्या काळात आईच्या रूपात धनप्राप्तीचे योग आहेत.

हे ही वाचा<< Pisces Yearly Horoscope 2023: मीन राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

कन्या (Virgo Zodiac)

शनीचा उदय होताच कन्या राशीच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. तुमच्या वक्तृत्वाने तुम्ही समोरच्याला भुरळ घालू शकता आणि यातूनच धनलाभाचे संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी मान- सन्मान वाढू शकतो यामुळे तुम्हाला येत्या काळात मानसिक शांती सुद्धा अनुभवता येईल. तुमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत.

हे ही वाचा<< पुढील ११ महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्ती कधी होतील श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या मंडळींना येत्या काळात भौतिक सुखाच्या प्राप्तीचे योग आहेत. येत्या सहा महिन्यात तुम्हाला शहर बदलण्याचे किंवा तुमच्या वास्तव्याचे ठिकाण बदलण्याची संधी लाभू शकते. धार्मिक कार्यात सहभागाने तुम्हाला मनाची शांती सुद्धा अनुभवता येऊ शकते. येत्या काळात पत्नीच्या रूपात लक्ष्मीचे आशीर्वाद लाभण्याची पूर्ण संधी आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 13:53 IST
ताज्या बातम्या