वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा नऊ ग्रहांपैकी सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह मानला जातो. वास्तविक शनीला एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा अशुभ म्हणजेच अपायकारक ग्रह आहे, कारण शनि हा कर्माचा दाता आहे, म्हणजेच कर्मानुसार फळ देणारा ग्रह आहे. म्हणूनच या ग्रहाच्या प्रभावाखाली लोक सामान्यतः दुःखी आणि तणावग्रस्त असतात. पण जन्मपत्रिकेतील शनिच्या स्थानावर त्या व्यक्तीला काय फळ मिळेल, हे ठरतं. व्यक्तीच्या कुंडलीत शनि ज्या घरामध्ये स्थित आहे त्यावरपरिणाम होतो. सध्या शनि मकर राशीत असून २९ एप्रिल रोजी या राशी बदलणार आहेत. या दरम्यान शनि स्वतःच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत २९ मार्च २०२५ पर्यंत विराजमान राहील. चला जाणून घेऊया शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर सर्वाधिक परिणाम होईल.

कर्क: ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी पुढील अडीच वर्षे त्रासदायक ठरू शकतं. कारण शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच या राशीच्या लोकांवर शनि अडीचकीला सुरुवात होईल. ज्योतिष शास्त्रानुसार शनि अडीचकीच्या काळात कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

वृश्चिक: कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने वृश्चिक राशीच्या लोकांवरही शनि अडीचकीची सुरुवात होईल. शनि अडीचकीचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काम संथ गतीने पूर्ण होते. असे मानले जाते की शनिदेवाच्या अडीचकीमुळे कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

मकर: ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीला सावध राहण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो. शनिच्या या संक्रमणाने मकर राशीच्या लोकांसाठी शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. या दरम्यान अनेक समस्या उद्भवू शकतात, अचानक बिघडलेल्या तब्येत सोबतच मनात अस्वस्थता आणि विचलितता देखील येऊ शकते. या काळात जास्त विचार करणे टाळा.

Mangal Gochar: युद्धाचा कारक असलेला मंगळ ग्रह शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार, या राशींची चिंता वाढणार

कुंभ: ज्योतिषांच्या मते, शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप कठीण काळ सुरू होऊ शकतो, कारण या काळात या राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. या काळात व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या काळात अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन: ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी २९ एप्रिल २०२२ पासून शनिच्या संक्रमणाने शनी साडेसाती सुरू होईल. पहिल्या टप्प्यातत शारीरिक आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. ज्यांच्या कुंडलीत बलवान शनि आहे त्यांना लाभ होताना दिसतील. तर ज्यांच्या कुंडलीत शनि कमकुवत आहे त्यांना उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.