Shani Transit 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहांमधील सर्वात संथ गतीने प्रवास करणारा ग्रह आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांमधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो. याचा अर्थ असा की, मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागतो. आता २६ मे रोजी शनी अमावस्या आहे. या दिवशी शनी महाराज मीन राशीत भ्रमण करत आहेत, त्यामुळे ३० वर्षांनंतर असा योग जुळून आला आहे, त्यामुळे काही राशींच्या धनदौलतीत वाढ होऊ शकते. शनी देव या नशीबवान राशींना भरभरून यश व धनलाभ देऊ शकतात. या लकी राशी कोणत्या चला पाहूया…
‘या’ तीन राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. समाजात मान-सन्मान, पद मिळू शकतो.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळू शकते. पैशाची आवक वाढण्याची दाट शक्यता आहे. या काळात भौतिक सुखाचा आनंद मिळू शकतो. गाडी, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नातेसंबंधातील वाद मिटू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. या काळात कुटुंबासोबत प्रवास घडू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम ठरू शकतो.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. नोकरीची उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. या राशीतील तरुणांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफादेखील मिळू शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)