Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रात शनि हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या चालीमध्ये किंवा त्यांच्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. तर केतू ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. यामुळे ‘षडाष्टक योग’ तयार होत आहे. जेव्हा कुंडलीत शनि आणि केतू सहाव्या आणि आठव्या भावात विराजमान असतात, तेव्हा हा योग निर्माण होतो. षडाष्टक योग बनल्याने काही राशींनी येत्या नवीन वर्षात सतर्क राहावे, असे ज्योतिष्यांच्या मते सांगण्यात येत आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या राशी…
‘या’ ३ राशीच्या लोकांना राहावे लागेल सतर्क?
वृषभ राशी
शनि-केतू निर्मित ‘षडाष्टक योग’ वृषभ राशीच्या लोकांना त्रास देऊ शकते. करिअर आणि आर्थिक बाबींमध्येही तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे पैसे अडकू शकतात. आर्थिक बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे. नात्यात दुरावा वाढू शकतो. यादरम्यान तुम्हाला काळजी घ्यावी लागू शकते.
(हे ही वाचा : डिसेंबरपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन? सूर्यदेव मित्र राशीत प्रवेश करताच अचानक ‘या’ रूपात लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी )
वृश्चिक राशी
षडाष्टक योग बनल्याने वृश्चिक राशीतील लोकांना या काळात कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. जीवनात उलथापालथ होत राहण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. मालमत्तेबाबतही वाद होऊ शकतात. या काळात पैशाचे स्रोत बिघडू शकतात यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पुरेशी पगारवाढ आणि पदोन्नती न मिळाल्याने या राशीतील लोकांवर दुसरीकडे नोकरी शोधण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक नुकसानही सहन करावा लागू शकतो. पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)