Samsaptak Rajyog 2025 : ग्रहांचा अधिपती मंगळ हा एका विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो, ज्याचा परिणाम राशिचक्रातील १२ राशींवर होत असतो. त्यात २८ जुलै रोजी रात्री ०८ वाजून ११ मिनिटांनी मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल आणि १३ सप्टेंबरपर्यंत त्या राशीत भ्रमण करेल. तर शनी सध्या मीन राशीत वक्री स्थितीत विराजमान आहे. अशाने शनी आणि मंगळाचा समसप्तक राजयोग तयार होत आहे. या राजयोगाने काही राशींच्या जीवनात सुखाचे दिवस येऊ शकतात.

मेष (Aries Zodiac Sign)

मंगळ आणि शनीचा समसप्तक राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. त्यात आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. परदेशात सुरू असलेल्या व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात व्यवसायात खूप चांगले परिणाम दिसणार आहेत. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर अनेक क्षेत्रांत यशस्वी होऊ शकता.

तूळ ( Libra Zodiac Sign)

शनी-मंगळाचा समसप्तक योग तूळ राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकतो. अनावश्यक खर्च वाढतील; परंतु ते चांगल्या ठिकाणी खर्च होऊ शकतात. जर तुम्हाला कुठे तरी गुंतवणूक करायची असेल, तर हा एक उत्तम काळ आहे. तुम्ही व्यवसायात किंवा येणाऱ्या काळात तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खर्च करू शकता. परदेश प्रवासाच्या संधीदेखील उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही प्रवास, पर्यटन किंवा परदेशी व्यापारातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. त्याशिवाय परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. पण, या काळात तुम्हाला आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर (Capricorn Zodiac Sign)

शनी-मंगळाचा समसप्तक योग मकर राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. या काळात जमीन, घर, प्रवास किंवा रिअल इस्टेट या क्षेत्रात खूप फायदे होऊ शकतात. परदेशात आयात-निर्यात व्यवसायात तुम्हाला खूप नफा मिळू शकतो. तुमचा खर्च वाढू शकतो. परंतु, तो खर्च चांगल्या कामातच खर्च होईल. तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. परंतु, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्हाला रागावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. कारण- तसे न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.