Shani Nakshatra Parivartan 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळाने राशीपरिवर्तन करतो तसेच वेळोवेळी नक्षत्र बदलत असतो. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीदेवाच्या राशीपरिवर्तनामुळे, नक्षत्रपरिवर्तनामुळे किंवा हालचालींमुळे राशींवर अनेक अनुकूल-प्रतिकूल परिणाम दिसून येतात. १२ मे २०२४ रोजी सकाळी ८.०८ वाजता कर्म फळदाता शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहेत. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना शनिदेवाच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मिथुन राशी

शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिथुन राशींच्या मंडळींचे भाग्य उजळू शकते. या काळात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. मुलांकडून गोड बातमी मिळू शकते. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. 

(हे ही वाचा : २०२५ पर्यंत शनिदेव ‘या’ राशींना करणार लखपती? शुभ राजयोग घडल्याने लक्ष्मी कृपेने होऊ शकतात भाग्याचे धनी )

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. पैसे मिळवण्याचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. वाहन खरेदीचे सुख लाभू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. व्यवसायात अनुकूल प्रगती होऊ शकते. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. मित्रांकडून आर्थिक फायदा होऊ शकतो. वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. तसेच, जर तुम्ही रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि हॉटेल लाइनमध्ये गुंतलेले असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. नवीन संधीही मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमचे बँक बॅलन्स वाढून तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू तुमची भक्कम होण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)